मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दरदिवशी नवनवीन खुलासे होत आहेत. मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने बिहार पोलिसांकडे या प्रकरणाशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली. बिहार पोलिसांनी अंकिताला संपर्क केला असता तिने अनेक गोष्टी सांगितल्या. यात 'मणिकर्णिका' सिनेमाच्या प्रमोशनवेळी सुशांतने तिला मेसेज केला असल्याचंही ती म्हणाली. रिलेशनशिपमध्ये फारसा आनंदी नव्हता सुशांत अंकिताच्या सांगण्यानुसार, 'मणिकर्णिका' सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिला मेसेज केला होता. यानंतर खूप वेळ दोघांची चर्चा झाली. यादरम्यान, सुशांत भावुक झाला आणि त्याने रियासोबतच्या नात्यात तो त्रासला असल्याचं सांगितलं. तसंच त्याला हे नातं संपवायचं असल्याचंही तो अंकिताला म्हणाला होता. रिया त्याला फार त्रास देते असल्याचं सुशांतने अंकिताला सांगितलं होतं. अंकिताने केलं ट्वीट आता याप्रकरणाची नव्याने चौकशी करत आहे. दरम्यान, अंकिताने बुधवारी यासंबंधी ट्वीटही केलं. या ट्वीटमध्ये तिने सत्याचा विजय होतो असं लिहिलं. अंकिताचं सुशांतच्या बहिणीशी श्वेता सिंहशी चांगली मैत्री आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कुटुंबाला भेटण्यासाठी अंकिता दोनदा पटणाही गेली होती. तिने अंकिताने कोणाकडे तरी सुशांत आणि तिचं रियासंबंधी झालेलं चॅट शेअर केलं. यात सुशांतने अंकिताला रियासोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. यानंतरच रिया चक्रवर्तीवर कुटुंबियांचा संशय वाढला. रियाने केली मुंबईत सुनावणी करण्याची मागणी याप्रकरणी रियानेही सर्वोच्च न्यायालयाकडे मुंबईत सुनावणी करायला परवानगी देण्याची याचिका दाखल केली आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास आधीपासूनच मुंबईत होत होता. त्यामुळे यापुढील तपासही मुंबईतच व्हावी अशी इच्छा तिने व्यक्त केली. रियाच्या वकिलांनी यांनीही संपूर्ण प्रकरण मुंबईत घडलेलं असताना त्याची चौकशी बिहारमध्ये करणं अयोग्य असल्याचं म्हटलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Eqm1Wy