
पटणा- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर अभिनेत्रीने सर्वोच्च न्यायालयात केस मुंबईत हलवण्याची याचिका दाखल केली. यासंबंधी बोलताना सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी मुंबई पोलिसांपैकी कोणीतरी रिया चक्रवर्तीला मदत करत असल्याचे सांगितले. याहून जास्त कोणते पुरावे हवेत- विकास सिंह यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं की, 'तिने (रिया) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तिने तर सीबीआय चौकशीसाठीही याचिका दाखल करायला हवी होती. पटणामध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर तिने आता मुंबईत सुनावणीची मागणी केली. यासोबतच हे संपूर्ण प्रकरण मुंबई पोलिसांकडे देण्याची याचिकाही दाखल केली. याहून मोठा कोणता पुरावा हवा ज्यावरून कळेल की मुंबई पोलिसांमधून कोणीतरी तिला मदत करत आहे.' एका वृत्तवाहिनीशी बोलताना विकास सिंह यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. सुशांतच्या कुटुंबियांनी २५ फेब्रुवारी रोजीच वांद्र्यातील पोलीस ठाण्यात रियाविरोधात तक्रार नोंदवली होती. अभिनेत्यासोबत काहीतरी अनर्थ घडणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली होती. सुशांत चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहत नसून तो ठीक आहे ना याची चौकशीही कुटुंबियांनी पोलिसांना करायला सांगितली होती. पटणा पोलिसांचा नकार याशिवाय पटणा पोलिसांनीही सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला होता. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्री संजय झा यांच्या मध्यस्थीने अखेर तक्रार नोंदवून घेण्यात आली. एवढंच नाही तर वकिलांनी हेही स्पष्ट केलं की, मुंबई पोलिसांनी एफआयआर लिहून घेतली नाहीच. शिवाय प्रकरणाची चौकशी दुसऱ्याच दिशेला जात होती. कुटुंबावर मोठ्या प्रोडक्शन हाउसचं नाव घेण्यावरून दबाव टाकण्यात येत होता. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आता बिहार पोलिसांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचीही चौकशी केली. अंकिताच्या सांगण्यानुसार, 'मणिकर्णिका' सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिला मेसेज केला होता. यानंतर खूप वेळ दोघांची चर्चा झाली. यादरम्यान, सुशांत भावुक झाला आणि त्याने रियासोबतच्या नात्यात तो त्रासला असल्याचं सांगितलं. तसंच त्याला हे नातं संपवायचं असल्याचंही तो अंकिताला म्हणाला होता. रिया त्याला फार त्रास देते असल्याचं सुशांतने अंकिताला सांगितलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33bGicO