नवी दिल्लीः भारतात चायनीज उत्पादनावर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. ने नुकताच 4K रिझॉल्यूशन आणि HDR सपोर्ट सोबत OATH सीरीजमध्ये लाँच केले होते. आता गुरुवारी थॉमसनने १० हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीचे टीव्ही लाँच केले आहेत. थॉमसनच्या नव्या टीव्ही अँड्रॉयड सोबत येतात. ३२ इंचापासून ५५ इंचांपर्यंत या टीव्ही उपलब्ध आहेत. यासोबत कंपनीने OATH लाइनअप मध्ये ७५ इंचाचा टीव्ही सुद्धा लाँच केला आहे. वाचाः आणि 9R TV:फीचर्स थॉमसनच्या PATH लाइनअपच्या टीव्हीला ९ए आणि ९आर दोन रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे. ९ए एचडी रेडी आणि फुल एचडी टीव्ही आहेत. तर ९आर ४के टीव्ही आहे. ९ए मध्ये कंपनीने ३२ इंचाचा एचडी PATH, ३२ इंचाचा एचडी बेजल लेज, ४० इंचाचा फुल एचडी आणि ४३ इंचाचा फुल एचडी या टीव्हीचा समावेश आहे. तर ९आर रेंजमध्ये ४३ इंचाचा ४के PATH, ५० इंचाचा ४के PATH आणि ५५ इंचाचा ४के PATH टीव्ही लाँच करण्यात आल्या आहेत. थॉमसन च्या 9A आणि 9R सीरीज अँड्रॉयड 9 वर चालतात. म्हणजेच युजर्संना प्ले स्टोरचा अॅक्सेस मिळणार आहे. टीव्हीत क्रोमकास्ट बिल्ट इन आहे. तसेच स्ट्रिमिंग सर्विसचा मजा घेवू शकते. टीव्हीत चांगला वाईड व्हूइंग अँगल च्या आयपीएस पॅनेल दिला आहे. ४के रिझॉल्यूशनची 9R टीवी HDR सपोर्ट सोबत येते. वाचाः थॉमसनच्या या टीव्हीत क्वॉड कोर १ गीगाहर्ट्ज सीपीयू आणि ग्राफिक्स साठी माली क्वॉड कोर जीपीयू दिला आहे. प्रेस रिलिज च्या माहितीनुसार रिमोट मध्ये सोनी लिव, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि यूट्यूब यासारखे अॅप्ससाठी वेगवेगळे बटन दिले आहेत. नेविगेशन साठी व्हाईसचा वापर केला जावू शकतो. रिमोट गुगल असिस्टेंट सोबत येतो. वाचाः THOMSON PATH 9A AND 9R TV: किंमत-वैशिष्ट्ये थॉमसन ९ए आणि ९आर सीरिज फ्लिपकार्टवर ६ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 9A सीरीज च्या 32 इंच एचडी Path ची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. ३२ इंचाचा एचडी बेजल लेस ११ हजार ४९९ रुपये, ४० इंचाचा फुल एचडी आणि ४३ इंचाचा फुल एचडी टीव्हीची किंमत १६ हजार ४९९ रुपये व १९ हजार ९९९ रुपये आहे. 9R सीरीजमधील ४३ इंचाच्या ४के पॅथ ची किंमत २१ हजार ९९९ रुपये, ५० इंचाचा 4K Path ची किंमत २५ हजार ९९९ रुपये आणि ५५ इंचाच्या 4K Path टीव्हीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः THOMSON OATH PRO TV:फीचर्स ओथ सीरीजमध्ये थॉमसनने याआधी ४३ इंच, ५५ इंच, ५ इंच स्क्रीन साईजमध्ये टीव्ही लाँच केले आहेत. आता कंपनीने ५० इंच आणि ७५ इंच स्क्रीन साइजमध्ये टीव्ही बाजारात उतरवले आहे. या टीव्हीत आधी लाँच झालेल्या टीव्हीचे फीचर्स आहेत. या टीव्हीत ४के सपोर्ट दिला आहे. तसेच एचडीआर सोबत डॉल्बी व्हिजन सपोर्ट दिला आहे. या टीव्हीत २.४ गीगाहर्ट्ज वाय फाय ओनली सपोर्ट दिला आहे. वायर्ड कनेक्शनसाठी या टीव्हीत ईथरनेट सपोर्ट दिला आहे. या टीव्हीत स्क्रीन रिफ्रेश रेड ६० हर्ट्ज आहे. या तिन्ही साईजच्या टीव्हीत क्वॉड कोर प्रोसेसर आणि ग्राफिक्स साठी माली ४५० जीपीयू आहे. टीव्हीत ८ जीबी स्टोरेज मिळतो. तसेच या टीव्हीत DTS TruSurround, डॉल्बी डिजिटल प्लस आणि 15वाट चे दोन स्पीकर्स दिले आहेत. THOMSON OATH PRO TV: किंमत-उपलब्धता ५० आणि ७५ इंचाचा थॉमसन ओथ टीव्हीची विक्री ६ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर सुरू केली जाणार आहे. याची किंमत २८ हजार ९९९ रुपयांपासून ९९,९९९ रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jOdT2x