Full Width(True/False)

एक्स मॅनेजरच्या मृत्यूने खालावली गेली सुशांतची मानसिक स्थिती

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात पटणामध्ये एफआयआर दाखल केली. यात त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की सुशांतला सतत भीती होती की रिया त्याच्या एक्स- मॅनेजरच्या दिशा सालियानच्या मृत्यूतू त्याला फसवू शकते. सुशांतच्या मृत्यूनंतर ही गोष्टही समोर आली होती की, सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी अनेकदा स्वतःचं नाव गूगल सर्च केलं होतं. सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनीही हेच सांगितलं की दिशाच्या मृत्यूमुळे सुशांत आणखीन मानसिक तणावात गेला. दिशाच्या मृत्यूने सुशांतची मानसिक स्थिती अजून बिघडली रिया चक्रवर्तीवर केस फाइल झाल्यानंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. यावेळी त्यांनी सांगितलं की, दिशाच्या मृत्यूचा सुशांतच्या मेन्टल हेल्थवर फार परिणाम झाला. सुशांतला सतत भीती वाटायची की या प्रकरणात रिया त्याला फसवेल. यामुळेच तो सतत आपलं नाव गूगलवर सर्च करायचा. बातम्यांमुळे सुशांत अजून घाबरला दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दियाने आत्महत्या केली अशा बातम्या समोर येऊ लागल्या. या बातम्यांमुळे सुशांत आणखीन घाबरला. रियाने सुशांतचा नंबरही ब्लॉक केला होता. यामुळेच त्याची भीती दिवसेंदिवस वाढत जात होती. रियाने फोन नंबर ब्लॉक केल्याने घाबरला होता सुशांत विकास यांनी पुढे म्हटलं की, सुशांतची मानसिक स्थिती पाहता रियाने खरंच तिथून जायला हवं होतं का? रियाने त्याचा फोन नंबर ब्लॉक केल्याने तो अधिक घाबरला. यासर्व गोष्टींनंतरच सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप केला आहे. या प्रश्नाची उत्तर फक्त रिया चक्रवर्तीच देऊ शकते. १. २०१९ आधी मुलाला कोणताही मानसिक त्रास नव्हता. रियाला भेटल्यानंतर असं काय झालं? २. जर त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते तर त्यासंबंधी आमची परवानगी का घेतली गेली नाही? ३. ज्या ज्या डॉक्टरांनी रियाच्या सांगण्यावर सुशांतवर उपचार केले तेही रियासोबत सामिल होते. त्यांनी सुशांतला कोणत्या गोळ्या दिल्या याचीही तपासणी व्हावी. ४. माझ्या मुलाच्या अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये होते. गेल्या वर्षभरात त्यातून १५ कोटी रुपये काढण्यात आले. पैसे अशा खात्यात गेले ज्याचा माझ्या मुलाशी काहीही संपर्क नाही. सर्व खात्यांची चौकशी व्हावी. ५. रियाच्या संपर्कात आल्यानंतर सुशांतच्या हातातून एकामागोमाग एक सिनेमे कसे जाऊ लागले होते, याचीही चौकशी व्हावी.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2D5Anv8