Full Width(True/False)

नेहा महाजनने हॉलिवूडमध्ये रोवला महाराष्ट्राचा झेंडा

मधुरा नेरूरकरमुंबई- एखाद्या कलेची मनोभावे सेवा केली तर ती कला तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायला आणि तुम्हाला घडवायला मदत करते असं म्हणतात. आज याचाच प्रत्यय अभिनेत्री आणि सितार वादक नेहा महाजनला आला. पुण्यात सतारची गोडी लागलेल्या नेहाने आज हॉलिवूडपर्यंत गवसणी घातली आहे. हॉलिवूड पॉपस्टार रिकी मार्टिनचा नावाचा ऑडिओ अल्बम नुकताच रिलीज झाला. खास लॉकडाउनमध्ये त्याने हा अल्बम रिलीज केला. यातील या गाण्यात नेहाने रिकीला साथ दिली. या गाण्यात नेहाने सतार वादन केलं आहे. सध्या रिकी मार्टिनचा हा अल्बम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर स्वतः रिकीच्या टीमने नेहाला संपर्क करून या गाण्यासाठी विचारले होते. नेहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती सताद वादनाचे अनेक कार्यक्रमही करते. इन्स्टाग्रामवर याच कार्यक्रमांचे काही व्हिडिओही तिने शेअर केले आहेत. हे व्हिडिओ पाहून रिकीच्या मॅनेजरने नेहाला संपर्क केला. आवश्यक ती बोलणी झाल्यानंतर नेहाने मुंबईतील एका म्युझिक स्टुडिओमध्ये प्रसन्न विश्वनाथन या साउण्ड रेकॉर्डिस्टच्या मदतीने गाण्यासाठी वैविध्यरुपात सतार वादन केले. आठ तासांच्या मेहनतीनंतर तिने रेकॉर्डिंग रिकी मार्टीनला पाठवलं. यानंतर मूळ गाणं आणि सतार वादन यांचं मिक्सिंग करण्यात आलं. नेहासाठी हा एक अविस्मरणीय अनुभवांपैकी एक आहे. ध्यानी मनी नसताना अचानक समोरून एवढी चांगली संधी चालून यावी यासाठी नेहा कृतज्ञच आहे. लॉकडाउनमध्ये हा अल्बम रिलीज केल्यामुळे फक्त ऑडिओ स्वरुपात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. पण लॉकडाउननंतर रिकी मार्टीनचा व्हिडिओ स्वरुपातही हा अल्बम येणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण या सर्व गोष्टींना अजून बराच वेळ असल्याचं नेहाने सांगितलं. स्वतः रितीने इन्स्टाग्रामवर नेहाच्या योगदानाचं कौतुक केलं. Pausa या नव्या Headphone Edition अल्बममध्ये Orbital Audio या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वडिलांचा पंडित विदूर महाजनांचा सितार वादनाचा वारसा नेहा पुढे नेत आहे. दिपा मेहता यांच्या 'मिडनाईट' या सिनेमातून तिने सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. नुकतंच तिने नेटफ्लिक्सवरील एक्सट्रॅक्शन सीरिजमध्ये काम केलं. दिपा मेहता यांच्या 'लैला' या सीरिजमध्येही नेहाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. लॉकडाउननंतर ती अजून दोन वेब सीरिजच्या चित्रीकरणावर काम करणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ECkmxo