Full Width(True/False)

'औषधं घेतल्यानंतर सुशांतचे पाय थरथर कापायचे'

मुंबई- जाऊन आज दिड महिन्यांहून अधिक काळ लोटला. या काळात अनेक गोष्टी समोर आल्या. पण गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाने एक वेगळीच पकड घेतली आहे. सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला. सुशांतच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशनवर उपचार घेत असल्याचं समोर आलं होतं. आता त्याच्या ट्रेनरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. डिसेंबरपासून त्याने वेगळ्या प्रकारच्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती. याच गोळ्यांमुळे त्याची तब्येत बिघडली. रियाला भेटल्यानंतर त्याने गोळ्या घेणं सुरू केलं टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत सुशांतचा ट्रेनर समी अहमदने धक्कादायक गोष्टींचा उल्लेख केला. समीने सांगितले की, सुशांत जेव्हापासून रियाला डेट करू लागला तेव्हापासून तो विचित्र गोळ्या घेऊ लागला. याआधी सुशांतने कोणत्याही प्रकारच्या गोळ्या घेतल्या नव्हत्या. या गोळ्यांमुळे सुशांतचे पाय कापायचे आणि त्याचा थेट परिणाम आरोग्यावर झाला. डिसेंबर २०१९ पासून त्याने या गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती. सुशांतला मध्येच गोळ्या सोडायच्या नव्हत्या याबद्दल सुशांतला विचारले असता त्याने या डिप्रेशनच्या डोळ्या असल्याचे सांगितले. तसेच या गोळ्यांनी त्रास होतो तर बंद करण्याचं मी त्याला सांगितलं होतं. पण त्याल ट्रीटमेन्ट अर्ध्यावर सोडायची नव्हती म्हणून त्याने तो कोर्स पूर्ण केला. सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये विरोधत केलेल्या आरोपांनाही महेशनं दुजोरा दिला आहे. रिया आणि तिची आई सुशांतच्या आयुष्यातील प्रत्येकगोष्टीत हस्तक्षेप करायची असं महेशनं म्हटलं आहे. रिया आणि तिच्या आईनं सुशांतच्या घरातील सर्व कर्मचारी बदलले होते. सुशांतला त्याच्या घरच्यांसोबत बोलण्यातही दोघींनी बंधनं असायची. मित्र किंवा घरच्यांच्यासोबत बोलल्या नंतर सुशांत त्याचा फोन रिसेट करायचा असं महशे शेट्टीनं बिहार पोलिसांना सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी रियानं त्याच्या बॉडिगार्डला देखील कामावरून काढून टाकलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/315YMc3