Full Width(True/False)

ए.आर. रहमान पूर्ण करणार 'दिल बेचारा'चं अधूरं गाणं

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या सिनेमाने सध्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. सिनेमाला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. सिनेमांची गाणीही चाहत्यांना आवडली. गाण्यांचं पूर्ण क्रे सिनेमातलं अधूरं गाणं पूर्ण करण्याची रहमान यांना विनंती केली. 'Never Say Goodbye'हे गाणं सिनेमात अधूरं आहे. हे गाणं प्रदर्शित झालं नाही पण सिनेमात हे गाणं आहे. विशेष म्हणजे चाहत्यांनी सिनेमा इतका लक्षपूर्वक बघितल्याचं रहमान यांनाही आश्चर्य वाटत आहे. रहमान यांनी दिलं गाणं पूर्ण करण्याचं वचन हिमांशू नावाच्या एका चाहत्याने रहमान यांना ट्विटरवर टॅग करत म्हटलं की, 'दिल बेचारा' सिनेमातील गाणं पूर्ण करा. या त्याच्या ट्वीटला उत्तर देताना रहमान यांनी लिहिले की, नक्की पूर्ण करेन. तू तर अनरिलीज्ड गाणंही नोटीस केलं. लोकांच्या पसंतीस उतरली 'दिल बेचारा' सिनेमाची गाणी दिल बेचारा सिनेमातील सर्वच गाणी फार आवडीने ऐकली जात आहेत. टायटल ट्रॅक 'दिल बेचारा' आणि 'तारे गिन' ही दोन्ही गाणी लोकांच्या अक्षरशः तोंडात रेंगाळत आहेत. सोशल मीडियावर सिनेमाचे सीन, गाणी आणि सुशांतसाठीचे अनेक मेसेजचा पाऊस पडत आहे. एवढंच नाही तर सिनेमाला IMDb वरही भारतीय सिनेमांमध्ये वरचं स्थान मिळालं आहे. दरम्यान, 'दिल बेचारा' चित्रपट मे महिन्यातच प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउनमुळं आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम बाकी असल्याचं सांगत या चित्रपटाचं प्रदर्शन बऱ्याचदा पुढं ढकलण्यात आलं होतं. हा चित्रपट सिनेमागृहातच रिलीज करण्यात यावा अशी आग्रही मागणी चाहत्यांकडून करण्यात करण्यात येत होती. २०१४ मध्ये आलेल्या हॉलिवूडच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार' या सिनेमाचा 'दिल बेचारा' हा रिमेक आहे. सुशांतचा ‘दिल बेचारा’ ही एक प्रेमकथा असून, त्यात त्याची नायिका आहे. अभिनेता यानं देखील पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. तर सुशांतचा मित्र आणि दिग्दर्शक मुकेश छाबडा यानं हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. जॉन ग्रीनच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32Ry75r