Full Width(True/False)

आधी ज्येष्ठ राजकारण्यांनी राजीनामे द्या; मग कलाकारांवर बंधनं घाला: विक्रम गोखले

मुंबई: टीव्ही मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. चित्रीकरणासाठी घालून दिलेल्या काही नियमांतून सूट देण्यात आली, तरी ज्येष्ठ कलाकारांना मात्र सेटवर येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासू ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण आता ही मागणी सरकारने फेटाळून लावण्यात आली आहे. याच संदर्भात ज्येष्ठ अभिनेते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मालिका आणि चित्रपटांचं चित्रीकरण सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं काही नियम-अटींसह परवानगी दिली. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना-तंत्रज्ञांना चित्रीकरणात भाग घेता येणार नाही ही त्यातली एक प्रमुख अट होती. या अटीसह आणखी काही अटींचा फेरविचार करावा, अशी मागणी मनोरंजनसृष्टीनं सरकारकडं केली होती. त्यापैकी काही अटींमध्ये बदल करण्यात आला असला, तरी ज्येष्ठांना मात्र सेटवर येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही काळ सीनिअर कलाकारांना सेटवर नो एंट्री असेल. याच संदर्भात विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.'आधी राजकीय क्षेत्रातील ६० वर्षांवरील राजकारण्यांनी राजीमाने द्यावे आणि मग ज्येष्ठ कलाकारांवर बंधनं घालावीत', असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारचा हा नियम ज्येष्ठ कलाकांसाठी घातक असा असून या नियमामुळं ज्येष्ठ कलाकारल भिकेला लागतील अशा शब्दांत त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला.ज्येष्ठ कलाकार हवी की सर्व काळजी घेतली त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडं केली आहे. नव्या नियमांसह चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचारी चेहऱ्यावर मास्क लावून सेटवर वावरत आहेत. मेकअप आर्टिस्ट तर पीपीई किट घालून कलाकारांचे मेकअप करत आहेत. राज्य सरकारनं आखून दिलेल्या मार्गदर्शक बाबींनुसार चित्रीकरणाचं काम सुरू आहे. परंतु, मालिकेतल्या ज्येष्ठ कलाकारांना, अर्थात ६५ हून अधिक वय असलेल्या कलाकारांना इतर कलाकारांसह चित्रीकरणात सहभागी होता येत नाहीय. त्यांना सेटवर न येण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. तरीही ज्येष्ठ कलाकारांना मालिकेत दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ कलाकारांची मालिकेतली दृश्यं त्यांच्या स्वतःच्या घरीच चित्रित करण्यात येणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DatF6L