Full Width(True/False)

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या वडिलांवरच केले गंभीर आरोप

मुंबई: दिवंगत अभिनेता याच्या आत्महत्येनंतर जवळपास दीड महिन्यानंतर त्याचे वडील यांनी पाटणा येथील राजीव नगर येथे सुशांतची गर्लफ्रेंड हिच्यासह चार जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केले असून सात पानी एफआयआरमध्ये अनेक आरोप करण्यात आले आहेत. रियावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे.गेल्या दोन दिवसांत या प्रकरणात मोठी घडमोड झाली असून आता रिया चक्रवर्ती हिनंच सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केल्याचं समोर आलं आहे. रियानं सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आक्षेप घेतला आहे. तिच्याविरोधात दाखल झालेली एफआयआर वैध नसल्याचं तिनं म्हटलं आहे. बिहारमध्ये राजीवनगर पोलिस ठाण्यात रिया विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या परिसरात सुशांतच्या वडिलांचा प्रभाव आहे आणि त्यामुळं बिहार पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास निपक्षपातीपणे होणार नाही. अशा आशयाची एक याचिका तिनं सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. बिहार पोलिसांकडं या प्रकरणाचा तपास देणं योग्य नाही. मुंबई पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास करावा, असंही या याचिकेत म्हटलं गेलं आहे. तसंच सुशांतच्या वडिलांनी केलेले सर्व आरोप रियानं फेटाळले आहेत. 'मी सुशांतवर खूप प्रेम करायचे, एक वर्ष आम्ही लिव्हइन रिलेशनशीपमध्ये होतो, असंही तिनं कोर्टाला सांगितलं आहे. दरम्यान, या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ( ) ईडीकडून तपास होणार आहे. करण्यासाठी ईडीनं या प्रकरणात उडी घेतल्याची माहिती आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून गेल्या दोन दिवसांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतला फसवून त्याचे पैसे हडपल्याचा आरोप आहे. या अनुशंगानं आता अंमलबजावणी संचालनालयाकडून याची चौकशी होणार आहे. या प्रकरणी मुंबईच्या किंवा बिहारच्या शाखेत नव्यानं एक तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. तसंच सुशांतला आयटी उद्योजक बनायचं होतं. त्यासाठी तो गुंतवणूक देखील करत होता. अशीच एक गुंतवणूक त्यानं त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या नावे असलेल्या कंपनीत केली असल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये ही कंपनी सुरु करण्यात आली होती. ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) आणि प्रयोगशील तंत्रज्ञानात काम करत होती. केवळ उद्योजक बनून कमाई न करता आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेनं त्यानं गरीब आणि कुपोषित मुलांसाठी एक संस्था सुरु केली होती. फ्रंट इंडिया या संस्थेकडून आरोग्य सेवा आणि भूकबळीवर काम करत होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hMDiYq