Full Width(True/False)

मुंबई पोलिसांकडून मदत मिळेना, रिक्षातून फिरले बिहार पोलीस

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केस संदर्भात आता बिहार पोलिसही तपास करत आहे. सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. यासंबंधी पोलिसांची एक टीम मुंबईला पोहोचली. पण मुंबई पोलिसांकडून त्यांना सहकार्य मिळत नसल्याचं म्हटलं जात आहे. याचमुळे बिहार पोलिसांना रिक्षातून फिरावं लागत आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. सोशल मीडियावर यूझर यासंबंधीच्या अनेक प्रतिक्रिया देत आहेत. सुशांतची बहीण श्वेता म्हणली- सत्यमेव जयते एकीकडे सहकार्य करत नसल्याचं समोर येत आहे तर दुसरीकडे सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीने श्वेता सिंने इन्स्टाग्रामवर अशोक चक्राचं चिन्ह पोस्ट करत 'सत्यमेव जयते' लिहिलं. विशेष म्हणजे श्वेताने तिच्या याआधीच्या पोस्टमध्ये सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला टॅग केलं होतं. मुंबई पोलीस करत नाहीत कोणती मदत बिहार सरकारचे अॅडवोकेट जनरल ललित किशोर यांनी म्हटलं की, बिहार पोलिसांनी रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आक्षेप घेतला आहे. जेव्हा एका राज्यातली पोलीस दुसऱ्या राज्यात जाते तेव्हा त्यांना मदत केली जाते. मात्र या प्रकरणात मुंबई पोलीस कोणतीही मदत करताना दिसत नाही. मुंबई पोलिसांनी बिहार टीमला एक गाडीही दिली नाही. सध्या टीम रिक्षातून सर्व ठिकाणी फिरत आहे. रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर उत्तर देणार मुकुल रोहतगी सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार सरकारने या केसला पाठिंबा दर्शवला. या केसमध्ये रियाच्या याचिकेचा विरोध करण्यासाठी बिहार सरकारने भारत सरकारचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली. बिहारचे अॅडवोकेट जनरल ललित किशोर यांनी ही माहिती दिली. २०१८ मध्ये छापलेल्या एका रिपोर्टमध्ये मुकुल रोहतगी कोणत्याही केसच्या एका पेशीसाठी किमान ५ लाख रुपये घेतात. सीबीआय चौकशीची मागणी, पटणा उच्चन्यायालयात याचिका दाखल सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी केके सिंह यांनी पटणातील राजीव नगर ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी असंही अनेकांचं म्हणणं आहे. यासंबंधी पटणा उच्चन्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BLbEM6