सुशांतच्या वडिलांनी केवळ रियावरच नाही तर तिच्या कुटुंबियांवर देखील गंभीर आरोप केलेत. पाटण्यात रिया आणि कुटुंबियाच्या विरोधत एफआयआर देखील केली आहे. यात रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतसोबत जवळीक वाढवली. त्याच्या प्रत्येक खासगी गोष्टींत रियाचे कुटुंबिय देखील हस्तक्षेत करत होते.इतकंच नव्हे तर त्याला त्याचं राहतं घर सोडण्यास सांगितलं होतं. सुशांत राहत असलेल्या चांगल्या घरी भूतबाधा असल्याचं रियाच्या कुटुंबियांनी त्याला सांगितलं. याच कारणावरून त्याला राहत घर सोडावं लागलं होतं. याचा परिणाम सुशांतवर झाला होता. त्यानं ते चांगलं घर सोडून मुंबई एअरपोर्टच्या जवळ एका रिसॉर्टमध्ये राहायला भाग पाडलं होतं.
रिया सुशांतला सतत तू वेड लागल्यासारखं काही तरी बडबडत असतो अशी म्हणायची. तुझ्या डोक्यावर परिणाम झालायं असंही ती त्याला म्हणायची.तुला चांगल्या डॉक्टरांची गरज आहे. असं सतत त्याला सांगितलं जायचं. यानंतर सुशांतची बहिण त्याला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. सुशांतला पुन्हा पाटण्याला चलं असंही ती म्हणाली होती. परंतु रियाच्या कुटुंबियांनी त्याला घरी येऊ दिलं नाही. त्यावर मुंबईत राहण्यासाठी दबाव टाकला. असं सुशांतच्या वडिलांनी त्याच्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
रियानं सुशांतला औषधांचा ओव्हरडोस दिल्याचंही या एफआयआरमध्ये म्हटलं गेलं आहे. सुशांतवर उपचार करण्यासाठी रिया त्याला घेऊन तिच्या मुंबईतील घरी गेली होती. तिथं तिनं त्याला औषधांचे ओव्हरडोस दिले. त्यादरम्यान रियानं सर्वांना सांगितलं होतं की, सुशांतला डेंग्यू झाला आहे. पण त्याला डेंग्यू झालाच नव्हता. याच दरम्यान रियाच्या कुटुंबियांनी सुशांतच्या सर्वच गोष्टींवर ताबा मिळवला, असा आरोप करण्यात आला आहे.
रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यानंतर त्याचं फिल्मी करिअर देखील अडचणीत आलं होतं. सुशांतला ऑफर आलेल्या चित्रपटांमझ्ये स्वत:ला देखील भूमिका मिळावी, यासाठी रिया अट ठेवायची. मी असेल तरच तू सिनेमासाठी हो बोल असा दबाव सुशांतवर ती टाकायची, असा आरोप तिच्यावर करण्यात आल आहे. सुशांतचे मॅनेजरही तिनं बदलले होते. त्याच्या जागी स्वत:च्या मर्जीतल्या लोकांनी तिनं नेमलं होतं, असं सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे.
सुशांतच्या बॅंक अकाऊंटमध्ये तब्बल १७ कोटींची रक्कम होती. पण रिया आयुष्यात आल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या अकाऊंटमधून १५ कोटी रुपयांची रक्कम गायब झाली. ही रक्कम अशा काही खात्यांमध्ये जमा झाली आहे ज्याचा सुशांतशी काहीच संबंध नव्हता. तसंच तिनं त्याचं घर सोडताना त्याचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड, काही दागिने आणि महत्त्वाची कागदपत्र ही घरातून लंपास केली आहेत, असा थेट आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Evozmr