Full Width(True/False)

Realme 6i चा आज सेल, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः रियलमीचा लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोन रियलमी ६ आय चा आज सेल आयोजित करण्यात आला आहे. रियलमीची अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. १२ हजार ९९९ रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनला २४ जुलै रोजी भारतात लाँच केले आहे. वाचाः या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा, फास्ट चार्जिंग सोबत 4300 mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला या आधी रियलमी कंपनीने दोन फोन लाँच केले होते. आता भारतात रियलमी ६ सीरीजचे तीन स्मार्टफोन , Realme 6, आणि Realme 6 Pro विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रियलमी ६ सीरीजच्या जुन्या फोन्सप्रमाणे या फोनमध्येही 90Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर देण्यात आला आहे. वाचाः फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस रेजॉलूशन ( 2400x1080 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. ज्यात पंच होल सुद्धा देण्यात आला आहे. डिस्प्लेचे प्रोटेक्शन करण्यासाठी यात गोरिला ग्लास देण्यात आला आहे. स्मार्टफोनला ४ जीबी आणि ६ जीबी रॅम अशा दोन पर्यायात लाँच केले आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. कंपनी चीनची असली तरी या फोनमध्ये कोणताही बंदी घातलेल्या ५९ चायनीज अॅप्सपैकी एकही अॅप या फोनमध्ये ठेवला नाही. वाचाः रियलमी ६ आय ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोनला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/316qaXg