Full Width(True/False)

WhatsApp चॅट्सला जुन्या फोनमधून नव्या फोनमध्ये असे ट्रान्सफर करा

नवी दिल्लीः जुन्या फोनमधून नवीन फोनमध्ये व्हॉट्सअॅप चॅटिंग ट्रान्सफर करायची अनेकांना माहिती नसते. टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअॅपचा बॅकअप घेण्याचे अनेकदा विसरले जाते. नवीन फोनमध्ये बॅकअप घेण्यासंबंधीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे परंतु, तो अनेकांना माहिती नसतो. जुन्या फोनमधून नवीन फोनमध्ये चॅटिंग ट्रान्सफर करणे गरजेचे आहे. यात मीडिया अटॅचमेंटचाही समावेश आहे. व्हॉट्सअॅप चॅट्सा ट्रान्सफर करणे सोपी पद्धत म्हणजे गुगल क्लाउड किंवा iCloud वर त्याचा बॅकअप घेणे होय. यावरून नवीन फोनवर चॅट रिस्टोर करता येवू शकते. वाचाः अँड्रॉयड डिव्हाईससाठी आपल्या नवीन फोनमध्ये जुन्या फोनमधील चॅटिंग ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जुन्या फोनमधील व्हॉट्सअॅप उघडावे लागेल. यासाठी स्क्रीनवर सर्वात वर दिलेल्या उजव्या बाजुला ३ डॉट्सवर जावे लागले. वाचाः Settings मध्ये जा. त्यानंतर Chats वर क्लिक करा त्यानंतर Chats backup वर टॅप करा. त्यानंतर तुम्ही चॅट्स ला बॅकअप करण्यासाठी मॅन्यूअली किंवा ऑटोमॅटिकली (weekly, monthly etc) चा पर्याय निवडू शकता. वाचाः जर तुम्हाला चॅट्स मॅन्युअली करायची असेल तर व्हॉट्सअॅप त्याच वेळी गुगल ड्राईव्ह वर एक बॅकअप क्रिएट करेल. तसेच त्यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप बॅकअप करेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा करावी लागेल. जर तुम्हाला ऑटोमॅटिकली बॅकअप निवड करायची असलेतर व्हॉट्सअॅपवर दर आठवड्याला किंवा महिन्याला विना काही करता चॅट्स बॅकअप मिळेल. iPhones साठी आपल्या Apple ID मध्ये जा आणि iCloud ला टर्न ऑन करा. आता उघडा आणि Settings मध्ये जा आता यानंतर Chats वर क्लिक करा त्यानंतर पुन्हा Chat Backup वर टॅप करा. या ठिकाणी तुम्ही मॅन्यूअली किंवा ऑटोमॅटिकली बॅकअप निवड करू शकता. तुम्हाला व्हिडिओचा समावेश करायचा आहे की नाही हा पर्याय मिळेल. आता तुम्ही नवीन डिव्हाईसवरील व्हॉट्सअॅपमध्ये जा. त्याठिकाणी iCloud वरून जुनी चॅटिंग रिस्टोर करण्यासाठी विचारले जाईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32jg73x