नवी दिल्लीः स्मार्टफोनचा आज पुन्हा एकदा सेल आयोजित करण्यात आला आहे. १२ हजार ९९९ रुपये किंमत असलेल्या या फोनचा आज दुपारी १२ वाजता सेल सुरू होणार आहे. रियलमीची अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर या सेलला सुरुवात होणार आहे. या फोनला २४ जुलै रोजी भारतात लाँच केले आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी असलेल्या या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. वाचाः या ऑफर मिळणार फ्लिपकार्टवर RuPay डेबिट कार्डवरून पहिला प्रीपेड ट्रान्झॅक्शन केल्यास या फोनवर ३० रुपयांची सूट मिळणार आहे. तर यूपीआय मोडवरून आधी प्रीपेड ट्रान्झॅक्शन केल्यास ३० रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन फोन खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक डिस्काउंट दिला जाणार आहे. फोनला अॅक्सिस बज क्रेडिट कार्डवरून पे केल्यास ५ टक्के सूट मिळणार आहे. तसेच रियलमीच्या वेबसाइटवरून Mobikwik वरून पेमेंट केल्यास ५०० रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. आजच्या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय पर्याय सुद्धा दिला आहे. वाचाः रियलमी ६ आय ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोनला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा, फास्ट चार्जिंग सोबत 4300 mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः रियलमी ६ सीरीजच्या जुन्या फोन्सप्रमाणे या फोनमध्येही 90Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस रेजॉलूशन ( 2400x1080 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. ज्यात पंच होल सुद्धा देण्यात आला आहे. डिस्प्लेचे प्रोटेक्शन करण्यासाठी यात गोरिला ग्लास देण्यात आला आहे. स्मार्टफोनला ४ जीबी आणि ६ जीबी रॅम अशा दोन पर्यायात लाँच केले आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. कंपनी चीनची असली तरी या फोनमध्ये कोणताही बंदी घातलेल्या ५९ चायनीज अॅप्सपैकी एकही अॅप या फोनमध्ये ठेवला नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kI5mhO