Full Width(True/False)

रियाने सुशांतच्या बहिणीवर साधला होता निशाणा, एका क्षणात सत्य आलं समोर

मुंबई- सुशांतसिंह राजपूतशी निगडीत अनेक तथ्य समोर येत आहेत. यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होत आहे. यावेळी रियाने सुशांतसोबतचे व्हॉट्सअप चॅट आणि ग्रॅटिट्यूड नोट सोशल मीडियावर शेअर केली होती. यावरून सुशांत त्याच्या कुटुंबियांशी दूर होता आणि त्यातही त्याचे बहीण प्रियांकासोबतचे संबंध बिघडले होते हे दाखवण्याचा रिया प्रयत्न करत होती. मात्र आता त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने दोन व्हिडिओ शेअर करून रियाचा दावा किती खोटा आहे हे दाखवलं आहे. मी बहीण प्रियांकाच्या सर्वात जवळ आहे श्वेताने सलग दोन व्हिडिओ शेअर केले. यात सुशांत आणि प्रियांकाच्या नात्याबद्दल बोलले गेले आहे. यावेळी सुशांतचं पवित्र रिश्ता कोणासोबत आहे हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देतानाही त्याने प्रियांकाचंच नाव घेतलं होतं. सध्या श्वेताचे हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी रियाचं पितळ पुन्हा एकदा उघडं पडल्याची प्रतिक्रिया देत आहेत. या दोन व्हिडिओसोबत रियाने वडिलांचाही फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, 'बाबा.. यांच्याकडून आम्ही लढायचं कसं ते शिकलो. अनेक गोष्टी आपल्या विरोधात असतानाही सकारात्मक कसं रहायचं ते आम्ही शिकलो. ते आमची ताकद आहेत. आमचा अभिमान आहे.' शिवसेनेच्या मुखपत्रात सामनामध्ये संजय राऊत यांनी लिहिलं की, सुशांतच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. सुशांतला ही गोष्ट मान्य नव्हती. मात्र सुशांतच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसल्याचं आधीच स्पष्ट झालं आहे. यापूर्वीही रियाच्या वकिलांनी सुशांत आणि रियाचे व्हॉट्सअप चॅट शेअर केले होते. यात सुशांत प्रियांकाविरुद्ध रियाला सांगताना दिसत आहे. यात सुशांतने बहिणीला दृष्ट म्हटलं होतं. यावर रिया त्याला म्हणते की हे प्रकरण मिटवूया. रिया प्रियांकाला फोन करणार असल्याचंही म्हटलं जातंय. या चॅटवर सुशांतचे कौटुबिंक वकील विकास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत विकास म्हणाले की रियाकडून सुशांतच्या कुटुंबियांची छबी मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच सुशांत त्याच्या कुटुंबियांपासून दूर जावा यासाठी रियाने अनेक गोष्टी सुनिश्चित केल्या होत्या. तसेच सुशांतचा फोनही रियाच हाताळायची असा दावा विकास सिंह यांनी केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ioYALX