मुंबई- अलीकडेच सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी रिया चक्रवर्तीवर आरोप करत म्हटलं होतं की, तिने सुशांतला जाणीवपूर्वक कुटुंबापासून दूर केलं. असं म्हटलं जातं की सुशांतची बहीण प्रियांका जेव्हा रियाला पहिल्यांदा भेटली होती त्याच्या आठवड्याभरानंतरच बहीण- भावांमध्ये कटूता आली होती. रियानेच दोघांमध्ये भांडण लावलं होतं. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रिया आणि प्रियांकाची भेट झाली होती. तेव्हा सुशांतला भेटायला म्हणून खास प्रियांका मुंबईत आली होती. असे म्हणतात की यांच्या उपस्थितीत सुशांतने आपल्या बहिणीसाठी हृदय लिहिले होते. टाइम्सन्यूला सुशांतचे तेच पत्र आहे, ज्यात सुशांतने आपली बहीण प्रियंकासाठी लिहिले आहे. याचवेळी रियाच्या उपस्थितीत सुशांतने बहिणीसाठी खास पत्र लिहिलं होतं. टाइम्सनाऊच्या हाती आता हे पत्र लागलं आहे. हे पत्र पाहून प्रियांका आणि सुशांत एकमेकांच्या किती जवळ होते हे कळून येते. या पत्राची सुरुवात सुशांतने सोनचिडिया नावाने केली. त त्याने लिहिले की, 'माझ्या आत्म्याच्या कोपऱ्यापासून माझ्या ज्ञानाच्या खोलीपर्यंत आणि माझ्या आईचा प्रकाश सतत तेवत ठेवण्यात तुझ्याहून सक्षम कोणी नाही. माझ्या निर्णयांच्या अंधारात तू माझी मार्कर आहेस. तू माझी सर्वोत्तम बहीण आहेस. तू माझ्या ओळींमधला एक पॉझ आहेस. प्रेम आणि सन्मानच्यामध्ये गोंधळलेला तुझा भाऊ.' सुशांतच्या कुटूंबाच्या मते, या पत्रात जसा उल्लेख केला आहे तसं सुशांत आणि त्याच्या बहिणीचं नातं रियाला सतत खटकत होतं. तिने दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. पण यात तिला फारसं यश मिळालं नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी रियाने सुशांतसोबतचे व्हॉट्सअप चॅट आणि ग्रॅटिट्यूड नोट सोशल मीडियावर शेअर केली होती. यावरून सुशांत त्याच्या कुटुंबियांशी दूर होता आणि त्यातही त्याचे बहीण प्रियांकासोबतचे संबंध बिघडले होते हे दाखवण्याचा रिया प्रयत्न करत होती. मात्र त्याची बहीण श्वेता सिंह किर्तीने दोन व्हिडिओ शेअर करून रियाचा दावा किती खोटा आहे हे दाखवून दिलं होतं. मी बहीण प्रियांकाच्या सर्वात जवळ आहे श्वेताने सलग दोन व्हिडिओ शेअर केले. यात सुशांत आणि प्रियांकाच्या नात्याबद्दल बोलले गेले आहे. यावेळी सुशांतचं पवित्र रिश्ता कोणासोबत आहे हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देतानाही त्याने प्रियांकाचंच नाव घेतलं होतं. सध्या श्वेताचे हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी रियाचं पितळ पुन्हा एकदा उघडं पडल्याची प्रतिक्रिया देत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kCY1QH