मुंबई- करिना कपूर आणि सिनेमांपेक्षा मुलगा तैमूरमुळे जास्त चर्चेत असतात. तैमूरच्या जन्मापासून ते आतापर्यंत त्याचे अनेक फोटो इण्टरनेटवर व्हायरल होत असतात. मिळत असलेल्या माहितीनुसार करिना आणि सैफ दोघंही दुसऱ्यांदा पालक होण्याच्या तयारीत आहेत. ते दुसर्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत. चाहत्यांनीही करिनाला दुसऱ्या मुलासंदर्भात अनेकदा प्रश्न विचारले आहेत. इण्टरनेटवर आलेल्या रिपोर्टनुसार, करीना लवकरच आणखी एका मुलाची आई होणार आहे. या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की सध्या घरातील लोकांना आणि काही जवळच्या मित्र- मैत्रिणींनाच ही गोष्ट माहीत आहे. सध्या दोन्ही घरात आनंदाचं वातावरण असून प्रत्येकजण नव्या बाळाच्या आगमनासाठी उत्सुक आहे. स्वतः सैफ अली खान आणि करिनाने दोघांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. 'आमचं त्रिकोणी कुटुंब आता चौकोनी होणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी आभार' असा मेसेज देत सैफ आणि करिनाने ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. यापूर्वी एका चॅट शोमध्ये करिना म्हणाली होती की ती आणि सैफ कुटुंब वाढवण्याचा विचार करत आहेत. या शोमध्ये तिने हेही सांगितलं होतं की, कदाचित २ वर्षांनंतर ते दुसर्या मुलाचा विचार करतील. तैमुरच्यावेळी गरोदर असताना करिनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या बेबी बंपसह ते तैमुरच्या जन्मानंतरही अनेक फोटो व्हायरल झाले होते. आजही करिना आणि तैमुरचे फोटो सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये असतात. आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर करीना कपूर लवकरच 'लालसिंग चड्ढा' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आमिर खानही आहे. याशिवाय करण जोहरच्या मल्टीस्टारर 'तख्त' सिनेमावरही ती सध्या काम करत आहे. यात अनिल कपूर, विक्की कौशल, रणवीर सिंग, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XTqpEo