Full Width(True/False)

ओप्पोचा नवा स्मार्टफोन भारतात येतोय, २०२० मधील सर्वात स्लीम फोन

नवी दिल्लीः ओप्पो भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने गुरुवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. ओप्पो एफ १७ प्रोच्या लाँचच्या तारखेचा खुलासा मात्र कंपनीने केला नाही. परंतु, अपेक्षा आहे की, ओप्पोचा हा नवीन हँडसेट याच महिन्यातील अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः ओप्पोच्या माहितीनुसार, नवीन ओप्पो एफ १७ प्रो २०२० हा सर्वात स्लीम फोन असणार आहे. याची रुंदी केवळ ७.४८ मिलीमीटर आणि वजन १६४ ग्रॅम असणार आहे. ओप्पो एफ१७ प्रो कंपनीचा ब्रँड न्यू स्मार्टफोन आहे. या फोनच्या आणखी वैशिष्ट्यांविषयी अद्याप माहिती समोर आली नाही. वाचाः वाचाः ओप्पोचे ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट करण्यात आली आहे. या फोटोत एक जबरदस्त डिस्क्लेमर आहे. यावरून भारतात या फोनची किंमत २५ हजारांपेक्षा कमी असू शकते. तसेच कंपनीने खुलासा केला आहे की, ओप्पो एफ१७ भारतात लाँच होणार परंतु, आताच्या रेग्यूलर ओप्पो एफ१७ व्हेरिंयट संबंधी कंपनीने कोणतीही घोषणा केली नाही. कंपनीचा ओप्पो एफ १५ चे अपग्रेड व्हेरियंट असणार आहे. ओप्पो एफ १५ ला या वर्षी जानेवारीत लाँच करण्यात आले होते. वाचाः वाचाः ओप्पो एफ १५ मध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो पी ७० चिपसेट दिला आहे. हँडसेटमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत क्वॉड कॅमेरा सेटअप आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये २० वॉटची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31aB8fR