Full Width(True/False)

Sushant Singh Rajput case : सुशांतसिंहला 'न्याय' मिळवून देणार सीबीआयचे हे ४ अधिकारी, त्यांच्याबद्दल जाणून घ्या!

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. बिहार सरकार या प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस करण्यास सक्षम असल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput case) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने एक विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. सीबीआयचे सहसंचालक मनोज शशिधर हे या पथकाचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. शशिधर यांच्यासह या पथकामध्ये गगनदीप गंभीर, पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल यादव यांचाही समावेश आहे. हे अधिकारी कोण आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aDKUdy