नवी दिल्लीः भारतात एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या 2020 चे अपग्रेडेड व्हेरियंटवर काम सुरू आहे. नवीन लवकरच भारतात लाँच करण्यात येवू शकतो. 91Mobiles च्या एका रिपोर्टनुसार,Oppo A6 सप्टेंबर महिन्यात भारतात लाँच केला जावू शकतो. या फोनसंबंधी फारशी माहिती समोर आली नाही.परंतु, या फोनमध्ये अपग्रेडेड कॅमेरा, प्रोसेसर आणि डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. ओप्पोच्या या नवीन फोनची किंमत १० हजारांच्या जवळपास असू शकते. वाचाः गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच झालेल्या ओप्पो ए5 2020 स्मार्टफोनमध्ये ३ जीबी आणि ४ जीबी रॅम मध्ये लाँच केले होते. गेल्या डिसेंबर मध्ये याचे ६ जीबी रॅम व्हेरियंट लाँच करण्यात आले होते. ओप्पो ए५ २०२० मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस (720 x 1600 पिक्सल) डिस्प्ले आहे. सेफ्टी साठी यात कॉर्निंग गोरिला ग्लास दिला आहे. हँडसेटमध्ये वॉटर ड्रॉप नॉच दिला आहे. फोनला अँड्रॉयड ९ पाय बेस्ड कलरओएस ६.१ सोबत लाँच करण्यात आले होते. यात स्नॅपड्रॅगन ६६५ चिपसेट आहे. वाचाः ओप्पो ए५ २०२० मध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 5000mAh बॅटरी आहे. या फोनला रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते. ओप्पो ए५ मध्ये २०२० मध्ये रियर वर फिंगरप्रिंट सेन्सर, यूएसबी टाइप-सी सपोर्ट ब्लूटूथ 5.0, ड्यूल-बँड वाय-फाय आणि ड्यूल-सिम सपोर्ट मिळतो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fG5URT