पटणा- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी करत आहे. यासाठी एक विशेष टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. या टीममध्ये बिहारच्या गया जिल्ह्यातील टिकारी येथे राहणाऱ्या आयपीएस ऑफिसर यांच्या नावाचाही सहभाग आहे. सीबीआयच्या सर्वोत्तम ऑफिसरमध्ये नुपूर यांच्या नावाचा उल्लेख होतो. सध्या सीबीआयमध्ये त्या एसपी या पदावर कार्यरत आहेत. सुशांत केसची जबाबदारी सीबीआयकड देण्यात आल्यानंतर नुपूरच्या गावी सध्या आनंदाचं वातावरण आहे. सुशांतच्या चाहत्यांनाही या केसमध्ये न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. २००७ च्या बॅचच्या ऑफिसर आहेत नुपूर बिहारमधील टिकारी येथील सलेमपुर गावी राहणाऱ्या नुपूर प्रसाद या २००७ च्या आयपीएस आहेत. २००७ च्या एजीएमयूटी कॅडरच्या त्या आयपीएस आहेत. तसेच दिल्लीच्या शाहदराच्याही त्या डीसीपी होत्या. गेल्यावर्षी सीबीआयमध्ये त्यांची बदली करण्यात आली होती. सुशांत केससाठी सीबीआयने ज्या टीमची नियुक्ती केली आहे त्यात १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आणि सीबीआयचे सहसंचालक मनोज शशिधर यांच्याही नावाचा समावेश आहे. तसेच २००४ च्या बॅचच्या महिला अधिकारी गगनदीप गंभीर या केसचं पर्यवेक्षण करतील. नुपूर यांच्या गावी जल्लोषाला सुरुवात टिकारी सलेमपूर गावात राहणाऱ्या इंदूभूषण प्रसाद यांची नुपूर ही एकुलती एक मुलगी आहे. सुशांत केसची जबाबदारी मिळाल्यानंतर नुपूर यांच्या गावी जल्लोषाचं वातावरण आहे. याच गावी राहणाऱ्या नुपूर यांच्या काकांनी नंदू सिन्हा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मुलगी पाहता पाहता कधी मोठी झाली कळलंच नाही. नुपूर लहानपणापासून स्वभावानी शांत आणि हुशार होत्या. आता ही केस नुपूर त्यांच्या कौशल्याने सोडवतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी केके सिंह यांनी रियासह तिच्या कुटुंबियांवर आणि सुशांतच्या एक्स बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सध्या ईडी या प्रत्येकाचीच चौकशी करत आहे तर सीबीआयनेही या सर्व सहाजणांवर एफआयआर दाखल केली आहे. लवकरच सीबीआयचे अधिकारीही सर्वांची चौकशी करणार आहेत. दरम्यान, केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ईडीने सुशांतच्या बँक अकाउंटच्या चौकशीत शुक्रवारी रियाची आठ तासांहून अधिक तास चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत रियाने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं न दिल्यामुळे तिला आज पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31CKksj