Full Width(True/False)

रसोडे में कौन था? 'साथ निभाना साथिया २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: 'रसोडे में कौन था? मैं थी? तुम थी? कौन था?' हे मॅशअप सध्या नेटकऱ्यांची वाहवा मिळवत आहे. काही वर्षांपूर्वी दिसलेल्या 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील सासू आणि दोन सुनांची पात्रं प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. याच मालिकेतील 'रसोडे में कौन था?' या डायलॉगवर हे मॅशअप तयार करण्यात आलं आहे. अगदी काही क्षणात या मॅशअपला लाखोंच्या संख्येनं लाइक्स मिळाले. कोकिलाबेन, रसोडे में कौन था आणि राशीबेन यांना घेऊन केलेलं मॅशअप साँग सध्या सोशल मीडियावर गाजतंय.आणि आता 'साथ निभाना साथिया'चा दुसरा सीझन लवकरच टीव्हीवर येतोय. दुसऱ्या सीझनबरोबरच म्हणजेच आणि गोपी बहू म्हणजेच पुन्हा येत येणार अशी चर्चा सुरू आहे. काही नव्या व्यक्तिरेखा आणि अनेक नवीन ट्विस्ट यात असतील. ही एक कौटुंबिक मालिका असेल, असं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, व्हायरल झालेलं हे मॅशअप औरंगाबाद स्थित या मराठमोळ्या संगीतकारानं बनवलं आहे.औरंगबादला राहणाऱ्या यशराजनं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. संगीताची आवड त्याला लहानपणापासूनच होती. कॉलेजमध्ये असताना त्यानं मानाचा समजला जाणारा सिंहगड करंडकही मिळवला आहे. त्यानंतर त्यानं मालिकांना आणि शॉर्ट फिल्म्सना पार्श्वसंगीत देण्यास सुरुवात केली. तसंच यशराज मुखाटे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही तो अनेक कलाकृती सादर करत असतो. स्टुडिओतील काम झाल्यावर विरंगुळा म्हणून तो मॅशअप बनवतो. यापूर्वी त्यानं अनेक मॅशअप्स तयार केली असून 'रसोडे में कौन था?' हे लोकांच्या विशेष पसंतीस उतरलं. एवढंच नाही तर या मॅशअपवर मिम्सही बनवण्यात येत आहेत. यापुढेही अनेक मॅशअप ऐकायला मिळणार आहे, असं यशराजनं 'मुंटा'ला सांगितलं. त्यामुळे आणखीही काही धमाल मॅशअप्स लवकरच ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32Fgbt0