Full Width(True/False)

सुशांतच्या खोलीचं लॉक तोडलं आणि दरवाजा उघडायला गेलो..तेवढ्यात

मुंबई: बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणात रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. रोज नवीन खुलासे होत आहेत. असाच एका खुलासा एका या प्रकरणातील महत्त्वाच्या व्यक्तीनं आणि साक्षीदारानं केला आहे. सुशांत ज्या खोलीत मृतअवस्थेत आढळला होता त्या खोलीचं कुलूप उघडण्यासाठी एका चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलवण्यात आलं होतं. याच चावी वाल्यानं आता धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांतच्या खोलीचं कुलूप तोडणाऱ्या चावीवाल्यानं एबीपी माझा या वृत्त वाहिनीला या प्रकरणी मुलाखत दिली. १४ जून रोजी नक्की काय काय झालं, त्याला कोणी बोलावलं, त्यानं सुशांतच्या घरी काय पाहिलं? या सर्वाचा खुलासा त्यानं केला आहे. चावीवाल्यानं नक्की काय सांगितलं? १४ जून रोजी सुशांतचा मित्र याचा मला फोन आला. त्यानं गुगलवर सर्च करून माझा नंबर मिळवला होता. सिद्धार्थचा मला फोन आला. एक माणूस घरी एका खोलीत झोपलाय. पण तो दरवाजा उघडत नाहीए, आम्हाला दरवाजा उघडून द्या, असं तो मला म्हणाला. मी लगेचच सिद्धार्थनं दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बिल्डींगच्या खाली पोहोचल्यावर मी सिद्धार्थला पुन्हा फोन केला. कुठं यायचं ते विचारलं. तेव्हा तो म्हणाला सहाव्या मजल्यावर या. मी सहाव्या मजल्यावरील त्यांच्या घरी गेलो. ते मला घरी वरच्या मजल्यावर घेऊन गेले. कारण सुशांतचं घर ड्यूप्लेक्स फ्लॅट होता. मी सुशांतच्या खोलीचं लॉक पाहिलं. साधं लॉक नसून कॉम्प्यूटराइ्ड लॉक असल्यानं मी माझ्या टूल बॉक्समधून एक चावी काढली आणि ते लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. पण ते काही उघडलं नाही. हे दरवाज्याचं लॉक तोडावंच लागेल असं मी त्यांना सांगितलं. मी हातोडी आणि स्क्रू ड्रायवरनं सुशांतच्या दरवाज्याचं लॉ तोडत होतो. त्यामुळं जोरात आवाज येत होता. आवाज वाढला की, सिद्धार्थ आणि तिथं असलेले इतर लोकं मला थांबवायचे. खोलीच्या आतून काही आवाज येतोय का, हे दरवाज्याला कान लावून ऐकायचे. आणि पुन्हा लॉक तोडायला सांगायचे. आतून आवाज आला की, तुला लॉक तोडण्याचं थांबवावं लागेल, असं त्यांनी मला सांगितलं होतं. ७-८ मिनिटांत मी ते लॉक तोडलं. लॉक तुटल्यानंतर जेव्हा मी दरवाजा उघडायला गेलो तेव्हा मला थांबवण्यात आलं आणि बाजूला हो, असं सांगण्यात आलं. त्यानंतर मी आमचं ठरल्याप्रमाणे २००० रुपये घेतले आणि तिथून निघून गेलो. त्यानंतर तासाभरानंतर मला सिद्धार्थच्याच फोनवरून पोलिसांचा फोन आला. जिथं लॉक तोडलं तिथं ये असं सांगण्यात आलं. मी पुन्हा सुशांतच्या फ्लॅटवर गेलो. तिथं चार पाच जण जमले होते. तिथं त्यावेळी वातावरण होतं त्यावरूनतरी ही आत्महत्याच आहे, खून किंवा हत्या नाही, असं मला वाटतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YhMHA4