मुंबई: बॉलिवूडच्या अभिनेत्यांबरोबरच दाक्षिणात्य अभिनेत्यांचीही क्रेझ सध्या पाहायला मिळतेय. दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्यानं अभिनय कौशल्य आणि वेगळ्या स्टाइलनं तरुणांची मनं जिंकली आहेत. लवकरच तो एका वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याचं कळतंय. विजय आणि त्याचा भाऊ लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. या वेब सीरिजचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. पण, या सीरिजचं दिग्दर्शन केव्हीआर महेंद्र करणार असून, संदीप वांगा यांनी स्क्रीप्ट लिहिली आहे. तसंच, विजय लवकरच पुरी जगन्नाथ यांच्या चित्रपटातही दिसणार आहे. हा अॅक्शन चित्रपट असून तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो एका फायटरची भूमिका साकारणार आहे. तसंच हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यासाठी करण जोहर काम करणार आहे असं म्हटलं जातंय. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इतर भाषांमध्येही त्याचं डबिंग करण्यात येणार आहे. तेलुगू व्यतिरिक्त मी स्वत: हिंदीमध्ये डब करण्याचा प्रयत्न करणार आहे', असं विजयने म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QxDK15