मुंबई: बॉलिवूड चित्रपट म्हटलं की काही डोळ्यासमोर येतात काही विशेष चित्रपट. त्यापैकी एक म्हणजे '' .आजवर सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाला आज २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं बॉलिवूडसह प्रेक्षकांमध्येही याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. सलमान खान, माधुरी दीक्षित, , अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, यांनी चित्रपटात साकारलेल्या भूमिका विसरणं केवळ अशक्य असल्याचं प्रेक्षक सांगतात. या चित्रपटानं तेव्हा पाच फिल्मफेअर पुरस्कारही मिळवले होते. सुरुवातीला लग्नाची व्हिडीओ कॅसेट म्हणून हिणवल्या गेलेल्या या चित्रपटानं नंतर बॉक्स ऑफिसवर भरभरुन यश मिळवलं. अभिनेत्री हिनं एक ट्विट करत या २६ वर्षांच्या प्रवासासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. - चित्रपटाला पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम पटकथा आणि लता मंगेशकर यांना खास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. - १९९४ सालचा सर्वांत लोकप्रिय चित्रपट म्हणून 'हम आपके है कौन'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. - हा चित्रपट १९९४ साली सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता. जवळपास ७४ कोटींची कमाई चित्रपटाने केली होती. - बॉक्स ऑफिसवर शंभर दिवस हा चित्रपट चालला होता. - या चित्रपटासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितला सलमान खानहून अधिक मानधन मिळाल्याची चर्चा होती. - हिंदीत सुपरहिट ठरल्यानंतर तामिळ आणि तेलुगूमध्येही हा चित्रपट सुपरहिट झाला होता. आंध्रप्रदेशात हा चित्रपट पंचवीस आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालला होता


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gA9UEE