Full Width(True/False)

पडद्यावरचे 'श्री राम' म्हणाले आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाणार

मुंबई: अयोध्येत आज राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. देशभरात आनंद व उत्साहाचं वातावरण आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. टीव्ही क्षेत्रात इतिहास घडवलेल्या ३३ वर्षांपूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर लोकप्रिय ठरलेल्या ' मालिकेच्या कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मालिकेत 'श्री राम' साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी एक ट्विट केलं आहे. आजचा दिवस इतिहासत सोनेरी अक्षरात लिहिला जाणार आहे. राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानं जगभरातील राम भक्तांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. सर्वांना शुभेच्छा! जय श्रीराम!,', असं ट्विट गोविल यांनी केलं आहे. तसंच दीपिका चिखलिया यांनी 'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका केली होती. त्यांनी देखील हा भारतींयांचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या मालिकेतील राम, लक्ष्मण, भरत, सीता यांची भूमिका करणाऱ्याया कलाकारांना लोक देवच समजायचे. एकदा रामाची भूमिका करणारे अरुण गोवील नागपूरला आले तर लोकांनी त्यांची पूजा, आरती केली. त्यांच्या पाया पडले होते. दरम्यान, ३३ वर्षांपूर्वी सीता राम चरित अतिपावन... रामायण... रामायण... हे शीर्षक गीत सुरू झालं की रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागायची. देशातले लहान-मोठे, गरीब-श्रीमंत सारेच टिव्ही स्क्रिनसमोर बसायचे. अगरबत्ती लावल्या जायच्या, स्क्रिनवरच्या राम-लक्ष्मण, सीता, हनुमानाला भक्तीभावानं हात जोडले जायचे. आता करोनामुळं देशात संचारबंदी लागली आहे. लोकांनी जीवाच्या भयानं देवासमोर रामरक्षा म्हणत अगरबत्ती लावत पुन:प्रसारित झालेल्या रामायण मालिकेचा आस्वाद घेतला. गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या आहेत. तब्बल २ लाख ७५ हजार विटांतील १०० विटांवर 'जय श्रीराम' असं कोरलेलं आहे. यातील नऊ विटा पूजेत सामील करण्यात आल्या आहेत. मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री , राज्यपाल आनंदीबेन पटेल हेदेखील पूजेसाठी उपस्थित होते. दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ENk06Z