मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री हिनं आपल्या दमदार अभिनय कौशल्यातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. विविध विषयांवर आपली रोखठोक मतं मांडण्यातही ती पुढे असते. हिंदी सिनेसृष्टीत कोणते बदल पाहायला आवडतील? या प्रश्नावर तिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे. 'चित्रपटात महिला व्यक्तिरेखांचं चित्रण करण्याची पद्धत बदलायला हवी. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. महिलांमधील सुपरपॉवर सिनेमात अधिक दिसायला हवी', असं ती म्हणते. येत्या काळात चित्रपटसृष्टीत दिसू शकणाऱ्या बदलांबाबत ती एका मुलाखतीत बोलत होती. ती म्हणाली, की 'सगळ्यात आधी तर सिनेमात स्त्री-पुरुष व्यक्तिरेखांचं चित्रण ज्या पद्धतीनं आपण करतो ते बदलायला हवं. महिलांना यात बिलकूल दुर्लक्षित करता येणार नाही. आमच्याही इच्छा असतात, आम्हालाही महत्त्वाकांक्षा असतात. आमच्या शारीरिक गरजा असतात आणि आणि आम्हालाही भावना असतात. आमच्यामध्ये सगळ्याचा समतोल साधण्याची क्षमताही असते. मला वाटतं महिलांमध्ये सुपरपॉवर असते आणि मला वाटतं आपल्या चित्रपटांमध्ये हे अधिक प्रमाणात दिसायला हवं.' पुरुष व्यक्तिरेखांच्या चित्रणबाबतही ती व्यक्त झाली. ती पुढे म्हणाली, की 'त्याचप्रमाणे पुरुषांनाही ज्या पद्धतीने सिनेमात दाखवलं जातं तेसुद्धा बदलायला हवं. आपण पुरुषांवर किती दबाव टाकतो. त्यांना सतत सांगितलं जातं, की त्यांनी खंबीरच असायला हवं. त्यांनी रडायचं नसतं. त्यांनी कुठेही स्वत:च्या भावनांचं प्रदर्शन करू नये. 'मर्द को दर्द नही होता' किंवा 'पुरुषांना वाईट वाटत नाही' हे बदलायला हवं.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EE2NwS