Full Width(True/False)

सई ताम्हणकरनं विराटच्या फोटोवर केलेली 'ती' कमेंट व्हायरल

मुंबई: आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सगळे संघ सज्ज झाले आहेत. यंदाच्या स्पर्धेचं आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये करण्यात आलंय. भारतीय संघाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये संघाचं नेतृत्व करणारा दुबईत दाखल झाला आहे. दुबईत आल्यानंतर विराटनं आपल्या हॉटेलच्या रुमवर एक फोटो काढत चाहत्यांना आपण दुबईत पोहचल्याचं सांगितलं. साहजिकच विराटच्या या फोटोवर चाहत्यांनी त्याला, 'यंदा ट्रॉफी जिंकूनच ये…' असं सांगत शुभेच्छांचे संदेश दिले. अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं मात्र त्यावर, 'दाजी काळजी घ्या, सुरक्षित राहा' अशी कमेंट केली आहे. सईच्या या कमेंटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. दरम्यान, आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने दुबईमध्ये पोहोचल्यावर आयपीएलसाठी व्यायाम करायला सुरुवात केली आहे. कोहली सध्या क्वारंटाइनमध्ये आहे. पण तरीही आपल्या हॉटेलमध्ये तो कसा व्यायाम करतो आहे, याचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळतो आहे. कोहलीचा फिटनेस खेळाडूंमध्ये सर्वात चांगला असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर आयपीएल ही जवळपास दोन महिने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलसाठी खेळाडूंना चांगला फिटनेस ठेवावा लागतो. आता कोहलीने आपल्या फिटनेसवर काम करायला सुरु केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ltIYJG