मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चौकशीची मागणी केली होती. यात अभिनेते यांचंही नाव होतं. सुशांतचा मृत्यूनंतर शेखर यांनी अनेकदा आपलं मत निर्भीडपणे स्पष्ट केलं आहे. तसेच सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नाही असंही त्यांनी वारंवार सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेखर यांनी पुन्हा या संदर्भातील बर्याच गोष्टींबद्दल आपले मत मांडले. यादरम्यान त्यांनी वरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, 'जर तुम्ही एखाद्यावर प्रेम केलं असेल, तर ती व्यक्ती गेल्यानंतर तुम्ही त्याच्या कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवता. पण रियाने तसं काही केलं नाही. त्याचवेळी, रिया चक्रवर्तीने तिची केस लढवण्यासाठी भारतातील सर्वात महागड्या वकीलाची नियुक्ती केली. रियाचं स्वतःचं वार्षिक उत्पन्न १४ लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत रियाला एवढा महागडा वकील कसा परवडला हा प्रश्न उपस्थित होतो.' शेखर यांनी सुशांतच्या मृत्यूशी संबंधित इतरही अनेक प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'सीबीआय आपलं काम अत्यंत कार्यक्षम पद्धतीने करेल. सत्य समोर आणेल. मला यात कोणालाही दोष द्यायचा नाहीये. पण संशयाची सुई बर्याच लोकांवर जात आहे. कारण प्रत्येकाने वेगवेगळे जबाब दिले आहेत. सिद्धार्थ पिठाणी ते रूग्णवाहिकेचा माणूस सगळेच वेगवेगळी गोष्ट सांगत आहेत. त्यांचे जबाब एकमेकांशी जुळून येत नाहीत. असं वाटतं की त्यांना एक व्यक्तिरेखा साकारायला दिली होती. पण अभिनेता नसल्यामुळे त्यांना ती व्यक्तिरेखा नीट साकारता आली नाही.' दिशा सालियनचे पोस्टमार्टम २ दिवसानंतर सुशांतला इतकी घाई का झाली आहे? शेखर सुमन यांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टर रिपोर्टबद्दलही शंका उपस्थित केली. ते म्हणाले की, दिशा सालियनचं पोस्टमॉर्टम दोन दिवसांत करण्यात आलं होतं. पण सुशांतच्या बाबतीत खूप घाई केली गेली. तिथे कोविड- १९ चे नियम लागू होत नाहीत का? एवढी काय घाई होती की त्याचे पोस्टमॉर्टम लगेच केले गेले? तसेच मृत्यूच्या एका महिन्यानंतर सुशांतचं घर सील करण्यात आलं. इथेही एवढा उशीर का झाला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32cazGq