Full Width(True/False)

मराठी अभिनेत्रीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; हॅकर्सनी केली ४० हजारांची मागणी

मुंबई: अभिनेते-अभिनेत्रींची सोशल मीडिया अकाऊंट्स होणं नवीन नाही. बॉलिवूडच्या कलाकारांच्या बाबतीत तर हे अनेकदा घडतं. मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या असतानाच आणखी एका अभिनेत्रीचं हॅक करण्यात आलं आहे. 'मिसेस मुख्यमंत्री'फेम अभिनेत्री हिचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं असून तिलं फेसबुकवर याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सनी अमृताकडं तब्बल ४० हजारांची मागणी केली आहे. यानंतर तिनं तिच्या नावाचं नवीन अधिकृत अकाऊंट तयार केलं असून फेक अकाऊंटला फॉलो न करता अधिकृत अकाऊंटला फॉलो करण्याचं आवाहन केलं आहे. अमृता मिसेस मुख्यमंत्री मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. त्यानंतर सोशल मीडियावरही तिला मोठ्या प्रमाणात फॉलो करण्यात येत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तब्बल ७७ हजार फॉलोअर्स होते. याचाच फायदा हॅकर्सनी घेतला. तुम्हाला तुमचं अकाऊंट पुन्हा हवं असल्यास ४० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी हॅकर्सनी केल्यानंतर तिनं त्यांना न घाबरता आणि त्यांची पैशांची मागणी पूर्ण न करता नवीन अकाऊंट तयार केलं आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये खूप जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेले दिसून येत आहेत. अनेकजण या माध्यमाचा वापर करून मनोरंजन, आपल्यातल्या कला, उपयुक्त माहिती अशा गोष्टी अपलोड करत आहेत. मात्र या काळात अनेक कलाकारांना आणि क्रिएटिव्ह आशय बनवणाऱ्यांना 'तुमचं अकाऊंट काही कारणामुळे डिलीट होतं आहे, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचे आयडी पासवर्ड द्या', 'तुमचं अकाउंट काही वेळेत व्हेरिफाय होतं आहे तुमची माहिती आम्हाला पाठवा' असे मेसेज येत आहेत. त्याचप्रमाणे अनेक जणांच्या कामाशी निगडित असणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या नावानंसुद्धा वापरात असलेल्या सॉफ्टवेअरची माहिती जाणून घेण्यासाठी फोन आणि मेजेससुद्धा आलेले पाहायला मिळाले आहेत. सॉफ्टवेअर कंपनीच्या नावानं एक मेल येतो. खातरजमा करण्यासाठी पाहिलं तर त्या मेलमध्ये खऱ्या कंपनीचा पत्ता, फोन नंबर आणि बाकी गोष्टी दिलेल्या असतात. त्यामुळे तो मेल खरोखरच कंपनीकडून आला आहे आणि तेच माहिती विचारत आहेत, असं वाटतं. पण, प्रत्यक्षात असं नसतं. मराठी अभिनेत्रीचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; हॅकर्सनी केली ४० हजारांची मागणी आलेली लिंक युजरनेम व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मेसेजमध्ये आलेली लिंक नवीन ब्राउजरमध्ये ओपन करून चेक करावी. तुमच्या कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस असेल तर अशा फेक लिंक तो ओपन करणार नाही. ९० टक्के खबरदारी आपणच घेणं अपेक्षित असतं. वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर माहिती प्रसारित केली जाते. कोणतीही सोशल मीडिया कंपनी अशा प्रकारचे मेसेज युजरला पाठवत नाही हे लक्षात ठेवा. - उन्मेष जोशी, समन्वयक रिस्पॉन्सिबल नेटिझम


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DewvrT