Full Width(True/False)

एअरटेल या प्लान्सवर देतेय फ्री डेटा, रिचार्जवर ६ जीबी पर्यंत फायदा

नवी दिल्लीः भारती एअरटेलकडून काही प्लान्सवर कुपनची घोषणा करण्यात आली होती. आता बाकी प्लान्सवर याचा फायदा युजर्संना मिळणार आहे. युजर्संना फ्री डेटाचा फायदा आता २८९ रुपये, ४४८ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लान्सवर मिळणार आहे. म्हणजेच तिन्ही प्लान रिचार्ज केल्यास ग्राहकांना फ्री डेटा कुपन्स मिळणार आहे. वाचाः कंपनीकडून प्लानमध्ये फ्री डेटाचा फायदा मिळत होता. दोन १ जीबी डेटा आणि २८ जीबी डेटाची वैधतेचे व्हाऊचर्सच्या प्लानमध्ये २१९ रुपये, १४९ रुपये, २७९ रुपये, २८९ रुपये, ३९८ रुपये, ४४८ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. तसेच चार १ जीबी डेटा आणि ५६ जीबीच्या वैधता सोबत फ्री डेटा व्हाऊचर्सचा फायदा ३९९ रुपये आणि ४४९ रुपयांच्या प्लान्सवर मिळतोय. वाचाः कंपनी देतेय ६ जीबी पर्यंत डेटा एअरटेल ८४ जीबी वैधतेचे ५९८ रुपये आणि ६९८ रुपयांच्या प्लानसोबत सहा जीबी डेटा व्हाऊचर्स देत आहे. या व्हाउचर्सच्या प्लान्सची वैधता पिरियड मध्ये कधीही रिडीम केली जावू शकते. म्हणजेच २८ दिवसांची वैधता प्लानसोबत २ जीबी, ५६ दिवसांची वैधतेसोबत ४ जीबी आणि ८४ दिवसांच्या प्लानसोबत ६ जीबी डेटा फ्री मिळत आहे. वाचाः तिन्ही प्लान्समध्ये वेगवेगळे बेनिफिट्स नवीन २८९ रुपये, ४४८ रुपये, आमि ५९९ रुपये किंमतीच्या या यादीत समावेश आहे. २८९ रुपयांचा प्लान १.५ जीबी डेली डेटा आणि फ्री कॉलिंग २८ दिवसांसाठी देते. ४४८ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग २८ दिवसांसाठी मिळते. तर ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग युजर्संना ५६ दिवसांसाठी वैधता मिळते. सर्व प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स मिळतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jn7Tg0