मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं कोडं अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. यात नवनवीन खुलासे होत आहेत. यात आता बिहार पोलीस विरुद्ध असा नवा वादही सुरू झाला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी केलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचं सांगितलं. २५ फेब्रुवारीला सुशांतच्या कुटुंबियांकडून वांद्रे पोलिसांना सुशांत संदर्भात सावध करण्यात आलं होतं असं यांनी सांगितलं होतं. यावर मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलीस म्हणाले की, '१४ जूनला सुशांतच्या आत्महत्येसंबंधी केस दाखल करण्यात आली. यानंतर तपासही सुरू झाला. सुशांतच्या वडिलांना आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं की त्यांनी २५ फेब्रुवारीला वांद्रे पोलीस ठाण्यात लिखीत तक्रार केली होती. मात्र अशी कोणतीही २५ फेब्रुवारीला करण्यात आली नाही. सुशांतच्या बहिणीचा नवरा (भावोजी) यांनी डीसीपी झोन ९ ला काही मेसेज पाठवले होते. यावर डीसीपी यांनी ओपी यांना लिखीत तक्रार करण्यास सांगितली होती. मात्र अनौपचारिक पद्धतीने ही गोष्ट सुटावी असं ओपी यांना वाटत होतं. मात्र असं शक्य नसल्याचं त्यांना तेव्हाच सांगण्यात आलं.' सुशांतचे वडील केके सिंह यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले होते की, '२५ फेब्रुवारी रोजी मी वांद्रे पोलिसांना सावध केलं होतं. माझ्या मुलाच्या सुशांतच्या जीवाला धोका असल्याचं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी काही केलं नाही. १४ जूनला जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा २५ फेब्रुवारी रोजी ज्यांच्याविरोधात मी तक्रार केली त्यांच्यावर कारवाई करण्याचं सांगितलं. मात्र ४० दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. यानंतर मी पटणात गेलो आणि तिथे एफआयआर दाखल केली. पटणा पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. आता आरोपी पळत आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DwCJTW