Full Width(True/False)

रेडमी ९ प्राईम भारतात लाँच, पाहा फोनची किंमत-वैशिष्ट्ये

नवी दिल्लीः शाओमीचा सब ब्रँड रेडमीने आपला नवीन हँडसेट भारतात लाँच केला आहे. या फोनला कंपनीने 'प्राइम टाइम ऑलराउंडर' टॅगलाईनचा वापर केला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आणि ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचाः Redmi 9 Prime ची किंमत व उपलब्धता रेडमी ९ प्राईमच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. तर १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. फोनची विक्री ई कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर प्राईम डे सेलमध्ये आणि मी डॉट कॉम वर सुरू होणार आहे. त्यानंतर हा फोन मी होम, मी स्टूडिओ आणि अन्य दुसऱ्या मोठ्या रिटेल पार्टनर्सवर उपलब्ध करण्यात येणार आहे. कंपनीने रेडमी ९ प्राईमसोबत एक कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर फ्री दिला जाणार आहे. रेडमी ९ प्राईमला कंपनीने स्पेस ब्लू, मिंट ग्रीन, सनराईज फ्लेयर आणि मॅट ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः Redmi 9 Prime ची फीचर्स मध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. कंपनीने सांगितले की, डिस्प्ले सोबत युजर्संना कॉन्टेंट पाहताना जबरदस्त अनुभव मिळणार आहे. अँड्रॉयड १० बेस्ड डार्क मोड फीचर असल्याने डोळ्यावर कमी दबाव पडेल. सुरक्षासाठी या फोनमध्ये कॉर्गिंग गोरीला ग्लास दिला आहे. फोन ऑरा ३६० डिझाईनसोबत येतो. वाचाः रेडमीच्या या फोनमध्ये २.० गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 जीपीयू दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, प्रोसेसरमुळे फोनचा गेमिंग आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स दमदार आहे. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोनमध्ये ड्यूल सिम आणि एक मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. वाचाः रेडमी ९ प्राईम मध्ये १३ मेगापिक्सलचा एआय प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेटअप दिला आहे. कॅमेरा एआय सीन डिटेक्शन फीचर सोबत येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा एआय फ्रंट कॅमेरा दिला आहे. रेडमी ९ प्राईम ला पॉवर देण्यासाठी यात 5020mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. परंतु, फोनसोबत बॉक्समध्ये १० वॉट फास्ट चार्जर मिळतो. कंपनीने सांगितले की, प्राईम सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. फोनला २६ तासांपर्यंत स्टँडबाय टाईम मिळेल. फोनममध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक, वायरलेस एफएम रेडियो, आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ 5.0 यासारख्या कनेक्टिविटी फीचर्स मिळतात. शाओमीच्या या फोनमध्ये रियरमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच फेस अनलॉक फीचर सुद्धा मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k93Y7E