Full Width(True/False)

सीबीआयकडून रियाला समन्स मिळाले नाहीत;अभिनेत्रीच्या वकिलांचा दावा

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याच्या मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड आणि तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयकडून समन्स बजावण्याची शक्यता असल्याची माहिती होती. परंतु अद्यापही सीबीआयकडून कोणतीही नोटीस किंवा समन्स मिळाले नसल्याचं रियाच्या वकिलांनी म्हटलं आहे. सुशांतचे वडिल केके सिंह यांनी बिहार मध्ये दाखल केलेल्या एफआयरमध्ये रिया आणि तिच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुशांतच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यासह पैशांची अफरातफर आदींसह अनेक आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. त्यामुळं सीबीआय अधिकारी रियाला लवकच चौकशीसाठी समन्स पाठवू शकतात, तसंच आजच म्हणजेच सोमवारी तिची चौकशी करण्यात येईल, असं म्हटलं जात होतं. परंतु तिला अद्यापही कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं रियाच्या वकिलांनी सांगितलं आहे. असं असलं तरी रिया सीबीआय चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचंही सांगितलं जात आहे. सीबीआयकडून रियाला नोटीस पाठवून देखील तिनं सहकार्य केलं नसल्यानं सीबीआयची टीम रियाच्या घरी जाऊन चौकशी करू शकते, अशी माहिती एका वृत्त वाहिनीवर देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाॉन्ड्रींग प्रकरणात अनेकदा रियाची चौकशी केली आहे. रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि सुशांतच्या बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांचेही जबाब नोंदवून घेतलेले आहेत. दुसरीकडं शोविक आणि रियाने दिलेल्या उत्तरांनी ईडीचे समाधान झालेले नाही. रियाने आपले उत्पन्न आणि खर्चाचा तपशील योग्यरित्या मांडलेला नाही, असे कळते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Qlgvas