मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता () प्रकरणात सध्या सीबीआयकडून अभिनेत्री आणि त्याची गर्लफ्रेंड हिची () हिची चौकशी करण्यात येत आहे. पण रियानं चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचं म्हटलं जात आहे. पण रियानं वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. इतकंच नाही तर रियानं सुशांतच्या कुटुंबियांवर गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत. सुशांच्या कुटुंबियांनी खोटे आरोप केल्यामुळं माझं आयुष्य उद्धस्त झाल्याचं रियानं म्हलं आहे. मी सुशांतकडून कधीही पैसै घेतले नाहीत, पैशांचा गैरव्यवहार करण्याचा प्रश्नच नाही असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर रियानं मुंबईतील खार परिसरात एक फ्लॅट खरेदी केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तिनं हा फ्लॅट ३०० चौरस फूटांचा असून ५० लाखांचं कर्ज काढल्याचं सांगितलं. तसंच या फ्लॅटचा १७ हजारांचा हफ्ता सुरू असून यापुढं मी हा हफ्ता कसा भरणार माहित नाही, कारण सुशांतच्या कुटुंबियांनी तर माझं आयुष्यचं उद्धस्त केलंय, असं रियानं म्हटलं आहे. रियाच्या या मुलाखतीवरुन सुशांतची बहिण हिनं निशाणा साधला आहे. 'तुला १७ हजारांचा हफ्ता भरता येणार नाही याची काळजी वाटतेय,पण मला सांगत सर्वात महागडा वकील केस लढतोय, त्यांची फी देणं तुला कसं परवडणार आहे', असा थेट प्रश्नचं श्वेतानं सोशल मीडियाच्या माध्यमातून रियाला विचारला आहे. दरम्यान,रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब यांच्याबद्दल सुशांतचे चाहते उलटसुलट चर्चा करत आहेत. सध्या रिया ही सीबीआय चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊसला जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रियाला संरक्षण देण्याचा विचार केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रियाच्या घरापासून ते डीआरडीओ गेस्ट हाऊस या दरम्यान रियाला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात येणार आहे. रियाच्या आधी सीबीआय पथकानं सुशांतसिंह राजपूतचा स्वयंपाकी नीरज, हाऊस हेल्पर केशव, कर्मचारी दीपक सावंत, फ्लॅटमेट सिद्धार्थ पीठानी, सीए, अकाउंटंट, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची चौकशी केली आहे. एनसीबी देखील ड्रग डिलिंगसंदर्भात लवकरच रिया चक्रवर्तीची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2G8BrQi