Full Width(True/False)

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला मुंबई पोलीस देणार संरक्षण

मुंबई: मृत्यू () प्रकरणात सध्या सीबीआयकडून अभिनेत्री आणि त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीची () चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच, रिया चक्रवर्तीला संरक्षण देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री ही सर्वाधिक चर्चेत आहे. ती या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी आहे. अंमलबजावणी संचलनालय (ईडी), आणि एनसीबी या तपास संस्थांच्या चौकशीच्या फेऱ्यात ती आहे. रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिया ही सीबीआय चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये जात आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब यांच्याबद्दल सुशांतचे चाहते उलटसुलट चर्चा करत आहेत. सध्या रिया ही सीबीआय चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊसला जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रियाला संरक्षण देण्याचा विचार केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रियाच्या घरापासून ते डीआरडीओ गेस्ट हाऊस या दरम्यान रियाला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, रियाच्या आधी सीबीआय पथकाने सुशांतसिंह राजपूतचा स्वयंपाकी नीरज, हाऊस हेल्पर केशव, कर्मचारी दीपक सावंत, फ्लॅटमेट सिद्धार्थ पीठानी, सीए, अकाउंटंट, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची चौकशी केली आहे. एनसीबी देखील ड्रग डिलिंगसंदर्भात लवकरच रिया चक्रवर्तीची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32FmwEE