Full Width(True/False)

मुंबई पोलिसांकडून घ्या...बिहार पोलिसांना सुशांतचे पोस्टमार्टम रिपोर्ट द्यायला कूपर रुग्णालयाचा नकार

मुंबई: अभिनेता यांच्या आत्महत्येचं प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली आहे. परंतु बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांकडून कोणत्याच प्रकारचं सहकार्य केलं जात नसल्याचं म्हटलं जात आहे. सुशांतच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीनं फिरत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता कूपर रुग्णालयानं देखील त्यांना मदत करण्यास नकार दिल्याचं समोर येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करतेय. असं असलं तरी मुंबई पोलिसांनी सुशांतचे पोस्टमार्टम रिपोर्ट बिहार पोलिसांना दिले नाहीए.त्यामुळं बिहार पोलिसांनी कूपर रुग्णालय गाठलं आणि तिथल्या संबंधीत डॉक्टरांकडं सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टसंदर्भात विचारणा केली. परंतु कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला आहे. ' सुशांतचे पोस्टमार्टम रिपोर्ट्स आम्ही मुंबई पोलिसांना दिले आहेत. तुम्हाला हवे असल्यास त्यांच्याकडून घ्या', असं कूपर रुग्णालयातील डॉक्टरांकडून बिहार पोलिसांना सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलीस करत नाहीत कोणती मदत बिहार सरकारचे अॅडवोकेट जनरल ललित किशोर यांनी म्हटलं की, बिहार पोलिसांनी रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आक्षेप घेतला आहे. जेव्हा एका राज्यातली पोलीस दुसऱ्या राज्यात जाते तेव्हा त्यांना मदत केली जाते. मात्र या प्रकरणात मुंबई पोलीस कोणतीही मदत करताना दिसत नाही. मुंबई पोलिसांनी बिहार टीमला एक गाडीही दिली नाही. सध्या टीम रिक्षातून सर्व ठिकाणी फिरत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33h4aMo