Full Width(True/False)

सोनू सूदनं खरा केला शब्द; ‘वॉरियर आजीं’ना सुरू करून दिला मार्शल आर्ट्स क्लास

पुणे: वयाच्या ८५ व्या वर्षी लाठी- काठीचा खेळ दाखवून नातवंडांचं पोट भरणाऱ्या ‘वॉरियर आजीं'ची प्रचंड चर्चा झाल्यानंतर अभिनेता यानं यांच्या या खास कलेला योग्य संधी मिळावी यासाठी त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. सोनू सूदनं शांताबाई पवार यांना दिलेला शब्द पाळला असून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यानं आजीबाईंच्या मदतीसाठी मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणारे प्रशिक्षण वर्ग सुरु करुन दिले आहेत. लॉकडाऊनमध्ये हालाखीच्या परिस्थितीमुळं शांताबाई पवार यांच्यावर भररस्त्यावर लाठी काठी फिरवून गुजराण करण्याची वेळ आली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. त्यांची ही जिद्द पाहून नेते आणि अभिनेत्यांनी देखील त्यांनी मदतीचा हात दिला. अनेक सामाजिक संस्था आणि इतर लोकांनी देखील या आजींच्या घरी जाऊन शक्य ती मदत केली. सोनू सूदनं त्यांचा हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. पण आर्थिक मदत न करता त्यानं आज्जींच्या मदतीनं भारतातील महिलांना सेल्फ डिफेन्स शिकवणारी एक लहानशी शाळा सुरू करायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता त्यानं पुण्यात शांताबाई पवार यांना मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणारे प्रशिक्षण वर्ग सुरु करून दिल्याची माहिती आहे. कोण आहेत ‘'? ( आजी ) ह्या हडपसर वैदवाडी गोसावी वस्ती इथं राहतात, त्यांची चार मुलं आणि सुना यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर १७ नातवाची जवाबदारी आली. त्यातील तीन मुलींचे त्यांनी काबाड कष्ट करून लग्नही केलं. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत. यामधील काही हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आजी स्वतः करतात. मागील साडे तीन महिन्या पासून करोनाचं संकट आलं आणि हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबाची उपासमारी सुरू झाली. अनेक दिवस पाच मुलीसह आजी उपाशी झोपल्या, मात्र त्यांच्याकडं कोणाचे लक्ष गेलं नाही. शेवटी लॉकडाऊन उठल्यानंतर आजीनं रस्त्यावर उतरून काठी फिरवण्याची कला सादर करण्यास सुरुवात केली. ८५ वर्षीय आजीची ही अचंबित करणारी करामत पाहून नागरिकांचंही त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं. अनेकांनी या आजीला सोशल मीडियावर व्हायरल करून केल्यानं अवघ्या दोन तीन दिवसातच त्या सोशल मीडियावरील स्टार झाल्या. आजीची ही कला पाहून नेते आणि अभिनेते त्यांच्या मदतीसाठी पुढं आले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YtfBgt