मुंबई टाइम्स टीम महानायक ''च्या सेटवर परतले आहेत असं कळतंय. करोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे झालेली टाळेबंदी यामुळे 'केबीसी'च्या बाराव्या पर्वाचं काम रखडलं होते. तरीही टाळेबंदीच्या काळात अमिताभ यांनी घरीच 'केबीसी'साठी नोंदणीचं आवाहन करणाऱ्या प्रोमोचं चित्रिकरण केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारकडून मालिकांच्या चित्रिकरणाला परवानगी देण्यात आल्यानंतरही ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या कलाकारांना शूटिंगमध्ये सहभागी होण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. दरम्यान खुद्द बिग बींना करोनाची लागण झाल्यानं ते जवळपास चार आठवडे नानावट रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर बिग बी करोनामधून बरे होऊन घरी परतले. उच्च न्यायालयानं ६५ वर्षांवरील कलाकारांवर असलेले निर्बंधही उठवले. त्यामुळे आता सगळेच अडथळे दूर होऊन केबीसीच्या सेटवर परतणं अमिताभ यांना शक्य झालं आहे. करोनावर मात करून सेटवर चित्रिकरणासाठी परतलेल्या अमिताभ यांना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. सुरक्षेसंदर्भातील सगळे नियम काटेकोरपणे पाळूनच चित्रिकरण केलं जात असल्याचं समजतंय. 'केबीसी'बरोबरच रणबीर कपूर आणि अलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातही अमिताभ यांची महत्त्वाची भूमिका आहे. याही चित्रपटाचं काही शूटिंग बाकी असून ऑक्टोबर महिन्यात ते पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gwgkUF