नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्लान ऑफर करीत आहे. हे प्लान ग्राहकांसाठी स्वस्त प्लान म्हणून ओळखले जातात. तसेच जवळपास या प्लानध्ये एका महिन्याची वैधता मिळते. आज आम्ही या ठिकाणी १४९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानची तुलना करीत आहे. रिलायन्स जिओ, वोडाफोन आणि एअरटेल मध्ये कोणता प्लान बेस्ट आहे. जाणून घ्या. वाचाः रिलायन्स जिओचा १४९ रुपयांचा प्लान हा रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लानपैकी एक आहे. १४९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना २४ दिवसांची वैधता मिळते. हा रोज १ जीबी डेटाचा प्लान आहे. या प्रमाणे ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा मिळतो. कॉलिंगमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ३०० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वोडाफोनचा १४९ रुपयांचा प्लान वोडाफोनचा १४९ रुपयांचा प्लान असून याची वैधता २८ दिवसांची आहे. यात युजर्संना २ जीबी डेटा मिळतो. कंपनी १ जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच ग्राहकांना ३०० एसएमएस आणि वोडाफोन प्ले तसेच झी ५ चे अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः एअरटेलचा १४९ रुपयांचा प्लान एअरटेलचा प्लान जवळपास वोडाफोनसारखाच आहे. एअरटेलचा प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. ज्यात एकूण २ जीबी डेटा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यात ३०० एसएमएस दिले आहेत. तसेच Airtel Xstream व विंक म्युझिकचे सब्सक्रिप्शन आणि फ्री हेलोट्यून्सची सुविधा दिली आहे. वाचाः वाचाः कोणत्या प्लानमध्ये जास्त फायदा जर आपल्याला जास्त डेटा हवा असेल तर तुमच्यासाठी जिओचा प्लान जास्त फायदेशीर आहे. ज्यात २४ जीबी डेटा मिळतो. जर तुम्हाला जास्त वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंग हवी असेल तर वोडाफोनचा प्लान बेस्ट आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hAujK4