Full Width(True/False)

Live Update: अज्ञात व्यक्तीला गेस्टहाउसवर घेऊन पोहोचली सीबीआय

मुंबई- सुशांतसिंह राजपूत (Live Update) चा मृत्यू तसा झाला या प्रश्नाचं उत्तर शोधायला निघालेल्या ची टीम आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. शुक्रवारी सकाळी सीबीआयची टीमने सुशांतचा स्वयंपाकी नीरजचा जबाब नोंदवून घेतला. तसेच डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांचीही भेट घेतली. सीबीआय दोन पथकात मुंबईत काम करत आहे. एक पथक वांद्रे पोलीस ठाण्यात गेलं. तिथून त्यांनी सुशांतची डायरी आणि कागदपत्रं घेतली. तर दुसरं पथक सुशांतच्या घरी गेलं असून तिथे डमी टेस्टची तयारी करत आहेत. वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सीबीआयच्या पथकाने मुंबई पोलिसांकडून डायरी व्यतिरिक्त सुशांतचा फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. सीबीआयची टीम दोन पथकात काम करत आहे. एका पथकाचं नेतृत्व एसपी अनिल यादव करत आहेत. जे पोलीस केस फाइलची चौकशी करत आहेत. तर दुसऱ्या पथकाचं नेतृत्व एसपी नुपूर यादव या करीत आहेत. ही टीम फॉरेन्सिक विश्लेषण करीत आहे. शुक्रवारी सीबीआयचं पथक सुशांतच्या घरी जाऊन तिथे क्राइम सीन पुन्हा रीक्रिएट करणार आहे. या दरम्यान डमी टेस्ट करण्यात येईल असंही म्हटलं जात आहे. सीबीआयची टीम पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक पुरावे मिळण्याची वाट पाहत आहे. हे पुरावे मिळताच सीबीआयची टीम सुशांतच्या घरी डमी चाचणीसाठी जाईस. यावेळी, फॉरेन्सिक टीम सुशांतचं वजन आणि उंचीप्रमाणे एक डमी तयार करेल आणि त्याला पंख्याला लटकवून क्राइम सीन रीक्रिएट करेल. तसेच पंखा एवढं वजन झेलण्यास सक्षम आहे की नाही याचीही तपासणी केली जाईल. या काळात बर्‍याच महत्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात असं म्हटलं जात आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. असं म्हटलं जातं की सीबीआयच्या पथकाने झोन ९ चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याकडूनही काही कागदपत्रं घेतली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EjjCgq