नवी दिल्लीः नोकियाचा स्मार्टफोन बनवणारी कंपनी आपला नोकिया ५.३ स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच करू शकते. तसेच कंपनी आणखी एक नोकियाचा स्मार्टफोन देशात लाँच करण्याची तयारी करीत आहे. च्या एका रिपोर्टमध्ये एक मार्केटिंग पोस्टरच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. नोकिया सी ३ चीनमध्ये याच महिन्याच्या सुरुवातीला समोर आणला होता. वाचाः वाचाः या पोस्टरवरून उघड झालेल्या माहितीनुसार नोकिया सी ३ ला भारतात एका वर्षाच्या रिप्लेसमेंट गॅरंटीसोबत उपलब्ध करण्यात येणार आहे. पोस्टरवरून हे माहिती होत आहे की, या फोनमध्ये ५.९९ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि रियर वर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाणार आहे. वाचाः वाचाः दुसऱ्या वैशिष्ट्यांवर नजर टाकल्यास नोकिया सी ३ मध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. नोकियाच्या या फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर दिला जाणार आहे. नोकिया सी ३ मध्ये ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो. फोनचे डायमेंशन 159.6×77×8.5 मिलीमीटर असणार आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला जावू शकतो. वाचाः नोकिया सी ३ स्मार्टफोनला चीनमध्ये ६९९ चिनी युआन (जवळपास ७ हजार ५०० रुपये) किंमतीत लाँच करण्यात आले आहे. फोन नोर्डिक ब्लू आणि गोल्ड सँड या दोन कलरमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. कनेक्टिविटीसाठी ४ जी व्हीओएलटीई, वाय फाय, 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, ग्लोनास, मायक्रो-यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स दिले जाणार आहेत. स्मार्टफोनमध्ये ३.५ एमएफ ऑडियो जॅक आणि एफएम रेडियो सुद्धा दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये 3040mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32b9X3L