Full Width(True/False)

64MP कॅमेऱ्याच्या Realme 7 स्मार्टफोनचा आज पहिला सेल

नवी दिल्लीः 64 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाईट वर आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. या फोनमध्ये जगातील पहिला मीडियाटेक हीलियो जी95 गेमिंग प्रोसेसर दिला आहे. तसेच 5000mAh बॅटरी दिली आहे. या फोनशिवाय कंपनीने M1 Sonic इलेक्ट्रिक टूथब्रश आणि रियलमी अॅडवेंचरर लगेजच्या सेलची सुद्धा घोषणा केली आहे. वाचाः वाचाः किंमत आणि ऑफर्स हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. या फोनच्या 6GB + 64GB मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. तर 8GB + 128GB मॉडलची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. Flipkart Axis बँक क्रेडिट कार्ड धारकांना ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जाणार आहे. वाचाः वाचाः रियलमी ७ स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.५ इंचाचा Full HD+ डिस्प्ले दिला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. डिस्प्लेत सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंचहोल मिळतो. तसेच पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. यात ८ जीबी रॅम पर्यंत १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आणि मीडियाटेक हीलियो G95 प्रोसेसर दिला आहे. तसेच फोनमध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळते. वाचाः वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा सोनी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32f2u4T