नवी दिल्लीः शाओमी (Xiaomi) भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. असे या फोनचे नाव असून याची लाँचिंग १५ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. लाँचिंगची घोषणा कंपनीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून केली आहे. रेडमी ९ सीरीजमध्ये कंपनीने आधीच भारतात तीन स्मार्टफोन Redmi 9, Redmi 9A, Redmi 9 Prime लाँच केलेले आहेत. वाचाः कंपनीने सांगितले की, रेडमीचा हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट वरून खरेदी करता येवू शकतो. नवीन स्मार्टफोनमध्ये ४जीबी रॅम शिवाय वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि अँड्रॉयड १० आधारित MIUI 12 सॉफ्टवेयर दिले जाणार आहे. हा फोन युरोपच्या मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेल्या Redmi 9A चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. वाचाः फोनच्या लाँचिंगसंबंधी एक डेडिकेटेड पेज कंपनीने लाइव्ह केले आहे. फोनच्या वरच्या भागात ३.५ एमएम हेडफोन जॅक दिला आहे. तर साईडमध्ये पॉवर आणि व्हॅल्यूम बटन दिले आहेत. वेबसाइटवर फोनचा ब्लू कलर व्हेरियंट दिसत आहे. याचे बाकीचे कलर लाँच इव्हेंट नंतर समोर येतील. वाचाः वाचाः किंमत किती कंपनीने सांगितले की, फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट दिला जाणार आहे. तसेच या फोनमध्ये लायक प्रोसेसर, जबरदस्त कॅमेरा, आणि एक मोठी बॅटरी दिली जावू शकते. कंपनीने आतापर्यंत स्मार्टफोनची अधिक़ृत घोषणा केली नाही. परंतु, रेडमी ९ सीरीजला पाहता या फोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35oquES