Full Width(True/False)

अंकितावर टीका करून पुरती फसली शिबानी, टीव्ही कलाकारांनी झापलं

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासाला वेगळं वळण लागलं आणि एनसीबीनं हिला अटक केली. रियाला अटक केल्यानंतर तिची मैत्रिण हिनं सुशांतची एक्स गर्लफ्रेंड हिच्यावर निशाणा साधला. अंकिता काही सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी रियावर आरोप करत असल्याचं म्हटलं आहे. अंकितावर टीका केल्यानंतर मात्र शिबानीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. सुशांत आणि अंकिताच्या चाहत्यांनीच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी अंकिताची बाजू घेत शिबानीला सुनावलं आहे. अंकितासाठी शिबानीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 'ही बाई दोन सेकंदाच्या प्रसिद्धीच्या शोधात आहे. याचसाठी ती रियाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे. ती स्वतः सुशांतसोबतच्या नात्यात आलेल्या अडचणींना तोंड देऊ शकली नव्हती. तिला असं करण्यास सांगितलं जात आहे.' यानंतर अनेक टीव्ही सृष्टीतील कलाकार अंकिताच्या समर्थनार्थ पुढं आले आहेत. अभिनेत्री रश्मी देसाई हिनं देखील अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 'अंकिता तू मोठी स्टार आहेस.तूझ्या प्रत्येक रुपात प्रेक्षकांनी तुला प्रेम दिलं आहे. तुला कुणालाही काहीही सांगायची किंवा काहीही सिद्ध करण्याची गरज नाहीए', असं रश्मीनं म्हटलं आहे. अभिनेत्री हिना खान हिनं देखील एक पोस्ट शेअर करत अंकिताला पाठिंबा दर्शवला आहे. 'एका व्यक्तीनं दोन्ही माध्यमांमध्ये आपलं कमावलं आहे. एका टीव्ही स्टार ते मोठ्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास केलाय. त्या व्यक्तीला २ सेकंदाची प्रसिद्धी तर बिलकून नकोय', असं हिना म्हणतेय. तर काम्या पंजाबी हिनं देखील शिबानी दांडेकर हिच्यावर निशाणाला साधलाय. '२ सेकंदाची प्रसिद्धी...? खरंच? ज्या व्यक्तीच्या निधनानं जी तिचं आयुष्य होता. एक वाईट व्यक्तीचं असा विचार करू शकतो. अंकिता जे तूला ओळखतात त्यांना सत्य माहित आहे',असं काम्यानं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RcTNC1