Full Width(True/False)

म्हणून सारा अली खानने तडकाफडकी मोडलं होतं सुशांतसोबतचं नातं

मुंबई- याच्या मृत्यू प्रकरणात सुरू झालेला तपास आता बॉलिवूडशी संबंधित ड्रग्जच्या वापरापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील बऱ्याच अग्रणी अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे. यात अभिनेत्री दीपिका पादुकोण, , रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांना एनसीबीने समन्स बजावले होते. यानंतर त्यांची अनेक तास चौकशीही करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, साराने एनसीबीकडे ती आणि सुशांत नात्यात असल्याची कबुली दिली होती. दोघं एकमेकांना काही काळ डेट करत असल्याचंही तिने मान्य केलं होतं. एनसीबीकडे केलं मान्य- सुशांतला डेट करत होती सारा अली खान सुशांतसिंह राजपूतच्या 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या साराला एनसीबीने चौकशीसाठीचा समन्स बजावला होता. अमली पदार्थांच्या वापरा संदर्भात तिला प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिचे सुशांतसोबतच्या नात्याचीही चौकशी केली. यात साराने ती सुशांतला डेट करत असल्याचं मान्य केलं. एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, साराने ब्रेकअप का केलं याचं कारणही एनसीबीला सांगितलं. सारा म्हणाली- सुशांत या नात्यात प्रामाणिक नव्हता वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार साराने एनसीबीला सुशांतशी ब्रेकअप का केलं याचं कारणही सांगितलं. या रिलेशनशिपमध्ये सुशांत एकनिष्ठ नसल्याचं ती म्हणाली. इतकंच नाही सूत्रांचा दाखला देत वेबसाइटने म्हटलं की, नात्यात सुशांत फारच पझेसिव्ह होता आणि साराला तिच्या निर्मात्यांना सुशांतचं नाव सुचवण्यास सांगायचा. सुशांतचा मित्र सॅम्युअल हाओकिपनेही सांगितल्या अनेक गोष्टी सुशांतचा मित्र सॅम्युएल हाओकिपने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यात सुशांत आणि सारा यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम असल्याचं सांगितलं होतं. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सॅम्युअलने सारा आणि सुशांतच्या नात्याबद्दल सविस्तर सांगितलं होतं. सॅम्युअल म्हणाला की, सारागी चांगली मैत्रीण होती. आम्ही एकत्र फिरायचो. मी तिला दोष देत नाही कारण मी दबावात येऊन ब्रेकअप करते असं कोणी मला लिखीत स्वरुपात दिलं नाही. सारा आणि सुशांतच्या ब्रेकअपनंतर रिया सुशांतच्या आयुष्यात आली. त्यामुळे मला नेहमीच असे वाटत होतं की सुशांतचे सारासोबतचे संबंध फार चांगले होते. मी माझ्या आधीच्या पोस्टमध्येही लिहिलं होतं की दोघंही एकमेकांचा आदर करायचे. त्या दोघांचा आणखीन एक सिनेमा यावा असं नेहमीच वाटायचं. ते दोघं एकमेकांसोबत फार आनंदी होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2S5dNHb