Full Width(True/False)

ओप्पो F17 स्मार्टफोन सीरीज भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः ओप्पोने भारतात आपली F17 स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. सीरीज अंतर्गत दोन स्मार्टफोन आणि F17 Pro लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे २०२० चा सर्वात स्लीम स्मार्टफोन आहे. ओप्पो F17 प्रो स्मार्टफोन ची किंमत २२ हजार ९९० रुपये आहे. हा फोन एकाच व्हेरियंटमध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज मध्ये येतो. फोन तीन कलर ऑप्शन मॅजिक ब्लू, मॅट ब्लॅक, मॅटेलिक व्हाइट मध्ये येतो. वाचाः ओप्पो F17 स्मार्टफोन दोन स्टोरेजमध्ये 4/64GB, 4/128GB, 6/128GB आणि 8/128GB मध्ये आले आहे. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये नेव्ही ब्लू, क्लासिक सिल्वर, डायनामिक ऑरेंगमध्ये येतो. ओप्पो F17 प्रो फोन ची विक्री ७ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. याची प्री ऑर्डर बुकिंग सुरू करण्यात आली आहे. ओप्पो F17 प्रो चे खास वैशिष्ट्ये ओप्पो एफ १७ प्रोमध्ये एचडी+ रेजॉलूशनचा 6.43 इंचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. जो ड्यूल पंच होल कॅमेरा सोबत येतो. यात सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा प्लस डेप्थ सेन्सरचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सोबत मीडिया टेक हीलियो P95 चिपसेट दिला आहे. यात 0 वॉट VOOC फ्लॅश चार्ज ४.० सपोर्टसोबत 4000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. ओप्पो F17 चे खास वैशिष्ट्ये ओप्पो F17 मध्ये तुम्हाला ६.४४ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसोबत येतो. या फोनमध्ये चार रॅम आणि स्टोरेज ऑप्शन दिले आहेत. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा, २ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. फ्रंट मध्ये मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. F17 प्रो प्रमाणे यात ३० वॉट फास्ट चार्जिंग सोबत 4000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QQRzbe