Full Width(True/False)

दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलच्या चौकशीत एनसीबीला आढळली 'ही' संशयास्पद गोष्ट

मुंबई: अमली पदार्थांसंबंधी आणखी सिनेतारकांना समन्स पाठवला जाणार नाही, असं नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) स्पष्ट केलं असलं तरी त्यांचा तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही.अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा वापर झाल्याचे समोर आल्याने एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याअंतर्गत एनसीबीच्या विशेष पथकानं सुशांतसिंहची मैत्रिण रिया चक्रवर्ती तसंच सिनेतारकांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एका मोठ्या कंपनीची अधिकारी जया शाह, यांच्या चौकशीत सिनेतारकांची नावे समोर आली होती. त्यावरून 'एनसीबी'ने अभिनेत्री , , व यांची चौकशी केली आहे. दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि राकूलप्रीत सिंह या चौघींची चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट एनसीबीला दिसून आली आहे. ती म्हणजे या चौघींनी दिलेली उत्तर तंतोतंत मिळती जुळती असल्याचं एनसीबीच्या निदर्शानास आलंय. दीपिकाचे दोन वर्षांपूर्वीचे व्हॉट्सअॅप चॅट्स एनसीबीच्या हाती लागले होते. याच्याच आधारावर त्यांनी दीपिकाला काही प्र्श्न विचारले. दीपिकाला 'माल' संदर्भात प्रश्न विचारले. याचं उत्तर देताना दीपिका म्हणाली की, 'हो, मी माल आहे का ?असा प्रश्न विचारला होता. पण 'माल' या शब्दाचा अर्थ ड्रग्ज असा होत नाही. आम्ही सिगारेटला माल म्हणतो. सिगारेटसाठी आम्ही माल हा कोडवर्ड वापरतो.' असं दीपिकानं तिच्या चौकशीत सांगितलं. तसंच 'हॅश काय आहे?' यावर दीपिकानं उत्तर दिलं की, 'आम्ही सिगारेटला माल म्हणतो आणि सिगारेटच्या वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सना हॅश आणि वीड म्हणतो. यानंतर एनसीबीनं हॅश आणि वीड हे वेगवेगळ्या ब्रॅण्डेड सिगारेट कशा असू शकतात असा प्रतीप्रश्न केला. यावर दीपिका म्हणाली की, 'हॅश आम्ही पातळ सिगारेटला तर जाड सिगारेटला आम्ही वीड म्हणतो.' विशेष म्हणजे श्रद्धा, सारा आणि रकुल यांनी त्यांच्या चौकशीत हेच स्पष्टीकरण दिल्याचं समजतं. इतकचं नाही तर चौघींनीही एनसीबीला दिलेल्या जबाबात स्पष्ट केलं आहे की त्यांना सिगारेट ओढण्याची सवय आहे. पण त्यांनी कधीही ड्रग्ज घेतले नाहीत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2G4s4BD