Full Width(True/False)

सुशांत केस- ड्रग्ज अँगलमध्ये चार मोठी नावं आली समोर

मुंबई- प्रकरणात रिया चक्रवर्तीनंतर आता तिच्या आई- वडिलांचीही चौकशी केली जात आहे. व्यतिरिक्त नारकोटिक्स ब्युरोही या प्रकरणात ड्रग अँगलने चौकशी करत आहे. सीबीआय, ईडी आणि नारकोटिक्स या तिघांच्या चौकशीत नवीन गोष्टी समोर येत आहेत. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, ड्रग्ज अँगलमध्ये त चार मोठी नावं यात सामिल असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांत प्रकरणात अमली पदार्थांच्या देवाण- घेवाणीत चार मोठी नावं गुंतलेली आहेत. यात मुंबईतील दोन नेते, एक टीव्ही अभिनेता आणि एक सिनेनिर्माता यांचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना या प्रकरणाचा तपास करत आहे. रिया चक्रवर्तीने याआधी तिने कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं म्हटलं. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्ट केलं की सुशांतला गांजा ओढायची सवय होती. या व्यतिरिक्त रियाचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, 'रियाने कधीही अमली पदार्थ घेतले नाही. तसेच रिया यासंबंधीची चाचणी करायलाही तयार आहे.’ अनेकदा खूप रडायचा सुशांत सुशांतचा माजी गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडाने अजून एक खुलासा केला आहे. मिरांडाने सीबीआयला सांगितलं की सुशांत अनेकदा खूप रडायचा. सुशांतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि रिया यांनीच त्याला वॉटरस्टोन क्लबमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही सुशांतच्या तब्येतीत काही विशेष सुधारणा झाली नाही. तो खूप रडायचा. याक्लबमध्ये सुशांतच्या बहिणीही त्याला भेटायला आल्याचा दावा सॅम्युअलने केला. घरात पार्टी असूनही खोलीत एकटा रहायचा सुशांत सॅम्युअलच्या म्हणण्यानुसार, रिया चक्रवर्तीचं मे २०१९ पासून सुशांतच्या घरी येणं- जाणं वाढलं. रियाचा भाऊ शौविक आणि त्याचे वडीलही सुशांतच्या घरी अनेकदा येत असत. रिया नंतर सुशांतसोबत राहू लागली. सुशांतला बिझी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पार्टी ठेवायची. पण काही वेळा सुशांत पार्ट्यांमध्ये हजरच रहायचा नाही. तो आपल्या खोलीत असायचा आणि स्वतःला बंदिस्त करून घ्यायचा.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31MHz9h