Full Width(True/False)

Tecno Spark Go 2020 भारतात लाँच, किंमत ६ हजार ५०० रुपये

नवी दिल्लीः ट्रान्झिशन इंडियाने मंगळवारी आपला नवीन हँडसेट लाँच केला आहे. कंपनीचा लेटेस्ट हँडसेट् गेल्यावर्षी लाँच केलेल्या टेक्नो स्मार्क गो चे अपग्रेड व्हर्जन आहे. नवीन टेक्नो स्पार्क गो २०२० मध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डॉट नॉच स्क्रीन, ड्यूल रियर कॅमेरे आणि 5000mAh ची बॅटरी आहे. वाचाः Tecno Spark Go 2020 ची किंमत टेक्नो स्मार्क गो २०२० ला भारतात ६ हजार ४९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. फोनला आइट जेडाई आणि अॅक्वा ब्लू कलरमध्ये लाँच केले जाणार आहे. फोनची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ७ सप्टेंबर पासून सुरू केली जाणार आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, १ महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी देली जात आहे. वाचाः Tecno Spark Go 2020 चे वैशिष्ट्ये टेक्नो स्मार्क गो २०२० मध्ये ६.५२ इंचाचा (1500 x 720 पिक्सल) एचडी+ डिस्प्ले दिला आहे. १.८ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो ए२० प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. इनबिल्ट स्टोरेज २५६ जीबी पर्यंत मेमरी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. वाचाः टेक्नोचा हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० गो एडिशन बेस्ड HiOS 6.2 वर काम करतो. फोन ड्यूल सिम सपोर्ट करतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये फेस अनलॉक फीचर सुद्धा दिले आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ड्यूल एलईडी फ्लॅश व सेकंडरी एआय लेन्स दिली आहे. कॅमेरा सीन डेटेक्शन बोकेह इफेक्ट आणि एआय ब्यूटी मोड सोबत येतो. वाचाः सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्लॅश सेल सोबत ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटवर एक फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. कनेक्टिविटीसाठी यात स्‍पार्क गो २०२० मध्‍ये अद्वितीय ऑडिओ-शेअरिंग वैशिष्‍ट्य आहे, जे युजर्सना एकाच वेळी दोन ब्‍ल्‍यूटूथ इअरफोन्‍स किंवा तीन ब्‍ल्‍यूटूथ स्‍पीकर्सशी कनेक्‍ट होण्‍याची सुविधा देते. ड्यूल 4जी वीओएलटीई, वाय-फाय जीपीएस आणि मायक्रो यूएसबी यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EKIChb